*भाजपा सरकार व उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू यांचा वरोरा शिवसेना तर्फे निषेध करण्यात आला*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा– भाजप चा जाहीर निषेध…. खासदार उदयन राजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यावर ‘हे तुमचे घर नाही हे माझे चेम्बर आहे ‘ इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा. असे छत्रपती शिवाजी महाराज बद्दल स्पष्ट खोटी भावना दाखवणारे भाजप पक्षाचे व्यंकय्या नायडू यांचा निषेध दाखवण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे शेतकरी नेते मा. नितीन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुखचंद्रपूर शिवसेना तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य यांच्या नेतृत्वखाली व्यंकया नायडू यांच्या निषेधार्थ उठाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा देऊन वरोरा येथे रॅली काढण्यात आली तसेंच मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यलय वरोरा यांना निवेदन पण देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मुकेश भाऊ जिवतोडे तालुका प्रमुख वरोरा, संदीप भाऊ मेश्राम शहर प्रमुख वरोरा, भूषणभाऊ बुरेले तालुका प्रमुख युवा सेना वरोरा, दिनेश भाऊ यादव नगरसेवक वरोरा, मनीष दोहतरे उपशहर प्रमुख वरोरा, विपीन काकडे उपतालुका प्रमुख वरोरा, सागर पिपमळशेंडे उपतालुका प्रमुख वरोरा, प्रज्वल जानवे, शुभम तोरे,दिलीप उमाते तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक शिवभक्त उपस्थित होते.