Breaking News

*रामु राठी यांना योद्धा शौर्य पुरस्कार प्रदान*

*रामु राठी यांना योद्धा शौर्य पुरस्कार प्रदान*

आर्वी-  येथील रामु राठी माजी आरोग्य सभापती न. प. आर्वी तथा नगरसेवक यांना ‘योद्धा शौर्य पुरस्कार’ योगेश्वरी बहुउद्देशीय समाजविकास संस्था पुलगाव यांनी बहाल केला आहे. रामु राठी यांनी कोरोना महामारीत जाणीवपुर्वक कर्तव्य बजावत असतांना जीवाची कसलीही तमा न बाळगता ‘रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा’ मानत आरोग्य यंत्रणेच्या मोहीमेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कोरोना टाळेबंदी दरम्यान रामु राठी यांनी शहरी तथा ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना वेळोवेळी मदत करीत सहकार्य केले. आवश्यकता भासल्यास अन्न, वस्त्र तसेच गोरगरिबांना औषधी विकत घेऊन दिल्या. रूग्णांची काळजी घेत रूग्ण पुन्हा तंदुरुस्त झाल्यावर रूग्णाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि त्यांनी दिलेले आशिर्वाद हिच खरी कमाई असल्याचे रामु राठी नेहमी म्हणतात.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …