*पुन्हा भानेगावात कोरोना विष्णाणूची लागण* *नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात भानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 1 नवीन बिना येथे एका घरातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह*

*पुन्हा भानेगावात कोरोना विष्णाणूची लागण*

*नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात भानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 1 नवीन बिना येथे एका घरातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- प्राप्त माहितीनुसार यांच्याकडे वास्तू पूजनाच्या कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या घरी बाहेरगावाहून काही पाहुणे व आजूबाजूचे पाहुणेमंडळी वास्तू पूजनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेले होते. आज सकाळी त्यांच्या तिघांच्या रिपोर्ट पाँझिटिव आला. त्यात एक वृध्द महिला (60) वर्ष तिच्या मुलगा वय (43) वर्षे नातीन (10) वर्ष यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोली वार्ड क्रमांक एक येथे कोणाची रँपिड टेस्ट घेण्यात आली त्यात त्यांच्या अहवाल पाँझिटिव आल्याने भानेगाव परिसरात खळबळ उडाली. वृद्ध महिलेची सून आणि नातू यांच्या अहवाल निगेटिव्ह आला.

सोमवारी वृद्ध महिलेच्या घरी वास्तु पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. तेव्हा बाहेर गावातील बरीच मंडळी त्यांच्या घरी आली होती. या तिघांपैकी नेमके कोण सर्वात आधी संक्रमित झाला याची माहिती घेणे सुरू आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे सुरू आहे. आजूबाजूचा परिसर सिलबंद करण्यात आला. भानेगाव परिसरातील भागाला ग्रामपंचायत मार्फत सँनिटायझर करण्यात आले. घटनास्थळी आरोग्य विभागाची संपूर्ण टिम, पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राम पंचायत टिम दाखल झालेली आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …