Breaking News

*खापरखेडा येथील 41 वर्षीय युवक कोरोणा पॉझिटिव*

*खापरखेडा येथील 41 वर्षीय युवक कोरोणा पॉझिटिव*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*खापरखेडा:- नागपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा वार्ड नंबर 3 येथील रहिवाशी 41 वर्षीय युवकाला कोरोणा विषाणूची लागण झालेली आहे. कोरोणा झालेला युवकाला नागपूर महानगर पालिका येथील अग्निशामक विभागात कार्यरत आहे. कोरोना पाँझिटिव युवक हा कोरोना अग्निशामक विभाग नागपूर येथील पॉझिटिव अधिकारी व वाहन चालकाच्या संपर्कात आलेला असून त्याचा कोरोना चाचणी गुरुवारी नागपूर येथील मेयो रुग्णालयात घेण्यात आली होता. त्याच्या रिपोर्ट आज पॉझिटिव आल्याने खापरखेडा येथे खळबळ माजली अाहे. मेयो रूग्णातील डाँक्टारांनी चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदकिय अधिकारी डाँ पेटकर यांना फोन करून खापरखेडा कोरोणा रूग्णांची पाँझिटिवची असल्याची माहिती दिली. संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने खापरखेडा नगरीत भीतीचे वातावरण तयार झालेले आहेत घटनास्थळी दुपारी 4 वाजता ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा, चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सावनेर तहसिल विभाग येथिल अधिकारी कर्मचारी पाँझिटिव आलेल्या युवकाच्या घरी आले. पाँझिटिव युवक हा घरीच होता आणि गुरूवार पर्यत अग्निशमन विभागाच्या कर्मचारी यांच्या संपर्कात होता. आजूबाजूचा परिसर हा सील बंद करण्यात आलेला असून आजूबाजूच्या परिसराला सँनिटायझर करण्यात आलेले आहे त्याच्या घरातील सदस्यांना महाजेनकोनी तयार केलेले क्लब नंबर 1 क्वारंटाईन सेंटरला पाठविण्यात आलेले आहे*.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …