Breaking News

*वरोरा येथिल उपजिल्हा रुग्णालमध्ये सोनोग्राफी तज्ञ् देण्याची मागणी* *वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी मशीन बिना डॉक्टरामुळे धुळ खात बसली आहे- अतुल वानखेडे*

*वरोरा येथिल उपजिल्हा रुग्णालमध्ये सोनोग्राफी तज्ञ् देण्याची मागणी*

*वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी मशीन बिना डॉक्टरामुळे धुळ खात बसली आहे- अतुल वानखेडे*

वरोरा प्रतिनिधी मूजम्मील शेख

वरोराउपजिल्हा रुग्णालय येथे. गर्भवती स्त्रियाच्या सोनोग्राफी काढण्यासाठी चंद्रपूर ला पायपीट…
तालूक्यातील तथा शहरातील गर्भवती मातांना कोरोना या भयंकर महामारीच्या काळात आपल्या गर्भधारणा संबधी माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरने दिलेल्या तारखे प्रमाणे त्यांना रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी काढण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली. आहे वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी मशीन बिना डॉक्टरामुळे धुळ खात बसली आहे त्यामुळे तालूक्यातील गरजु गरीब गर्भवती मातांना दारोदारी फिरण्याची वेळ आली.

संबंधित उपजिल्हा रुण्यालयातील या प्रकारामुळे गर्भवती स्त्रियाना होणारा त्रास लक्षात होता. वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल वानखेडे यांनी रुग्णालय अधिशक डॉ दुधे याची भेट घेऊन तात्काळ सोनोग्राफीतज्ज्ञाची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कोरोना या भयंकर महामारीचा काळात तालुक्यातील गरजू गरीब लोंकाना पोटाची भूक भागवण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे त्यात गर्भवती स्त्रियां सोनोग्राफी काढण्यासाठी रुग्न्यालायात गेलें असता मशीन असून डॉक्टर नसल्यामुळे त्यांना सोनोग्राफि पासून वंचित राहवे लागत आहें तशातच चंद्रपूर येथे येण्या जाण्यासाठी लागणार खर्च त्यात लॉक डॉउन सारखी परिस्तिथीत तालुक्यातील गरजू गरीब गर्भवती स्त्रियांना मानसिक तनाव होताना दिसत आहे अशातच या मानसिक तणावाने गर्भाशयातील निरागस बाळाला तणावाचा सामना करावा लागत आहे या अडचणी मधे शहरात सुद्धा एकही सोनोग्राफी हॉस्पिटल नसल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे जावे लागत आहे या सर्व अडचणीचा सामना गर्भवती स्त्रियांना करावा लागत असल्यामुळे वरोरा येथील रुग्णालयत सोनोग्राफी तज्ञ् देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …