Breaking News

*वर्धा कोरोना ब्रेकिंग आज सहा रुग्ण कोरोना बाधित* *5 रुग्णांची कोरोनावर मात* *ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 46* *एकूण रुग्ण 106*

*वर्धा कोरोना ब्रेकिंग आज सहा रुग्ण कोरोना बाधित*


*5 रुग्णांची कोरोनावर मात*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 46*

*एकूण रुग्ण 106*

*प्रतिनिधी पंकज रोकडे*

वर्धाजिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यातील 4 रुग्ण पूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. बाधित रुग्णात हिंगणघाट 1, कारंजा 1 आणि वर्धा 4 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 100 झाली असून एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 46आहेत. शिवाय आज आर्वी मधील दोन रुग्णांना आणि वर्धेतील 3 रुग्णांना उपचारानंतर कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 50 झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये हिंगणघाट शहरातील 25 वर्षीय युवक आणि कारंजा तालुक्यातील काकडा या गावातील एक 45 वर्षीय पुरुष तसेच वर्धा केशव सिटी 1 महिला व बोरगाव मेघे येथील दोन पुरुष एक महिला कोरोना बाधित आहेत.

आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या 100 वर पोहचली असून 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 46 झाली आहे.

प्रयोगशालेय तपासण्या

जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 5 कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6 हजार 906 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 6 हजार 776 निगेटिव्ह तर 100 पॉझिटिव्ह आहेत, तसेच 99 अहवाल प्रलंबित आहेत. आज 129 स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आयसोलेशन मध्ये 160 व्यक्ती आहेत.

गृह विलगिकरण

65 हजार 954 व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 59 हजार 180 व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून 6774 व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत.तसेच 236 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …