Breaking News

*आर्वी शहर रेड झोनच्या दिशेने*

*आर्वी शहर रेड झोनच्या दिशेने*

 

प्रतिनिधी- पंकज रोकडे
आर्वीरेड अलर्ट शहरात अजून १३ पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आहे आर्वी शहर रेड झोनच्या दिशेने नेताजी वॉर्ड 6 पेशंट. गणपती वॉर्ड ३ . वलीसाहेब वॉर्ड १ पेशंट हनुमान वॉर्ड २. खर्डा वॉर्ड १ पेशंट. धोका खूप जास्त वाढत आहे सर्वांना कळकळीची विनंती घरीच राहा सुरक्षित रहा.

*आष्टी तालुक्यात चार दिवसात कोरोना चे 10 रूग्ण*

आष्टी तालुक्यात कोरोनाची दुसरी एंट्री जोरदार झाली आहे. शनिवारी पाच रूग्ण बाधित आढळले आहे. मागील चार दिवसांत 10 रूग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.साहूर येथील आई-वडिलांसह दोन मुले व त्यांचा चालक बाधित असल्याचे एंटीजन चाचणीत निष्पन्न झाले आहे. यापुर्वी बुधवारी धाडी येथे एकाच परिवारातील पाच जण बाधित मिळाले होते. जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून आजमितीस रूग्णांची संख्या 118 वर पोहचली आहे. साहूर येथील व्यवसायी कामानिमित्त आपल्या दुग्रवाडा येथील चालकासोबत नेहमी नागपूर येथे जात होते, अशी माहिती आहे. आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात कोरोनाचा मोठया प्रमाणात शिरकाव झाला आहे. साहूर व दुग्रवाडा येथील बाधिताच्या संपर्कात आलेल्या 24 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने साहूर व दुर्गवाडा येथे उपाययोजना सुरू केल्या आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …