Breaking News

*आदिवासी माना जमातीचा तिसरा प्रमुख सण नागपंचमी अति उत्साहाने साजरा*

*आदिवासी माना जमातीचा तिसरा प्रमुख सण नागपंचमी अति उत्साहाने साजरा*

मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी

मनसर – जवळून 7 कि.मी.अंतरावर असलेल्या बोरडा सराखा या गावात आदिवासी *माना* जमात जास्त प्रमाणात आहे…असं म्हटलं जाते की,भगवान गौतम बुद्ध हे नागवंशीय राजे होते.आणि सम्पूर्ण आदिवासी जमात हे नागवंशीय जमाती होत्या,सर्व आदिवासी हे निसर्गपूजक होते.निसर्गातील सर्व वस्तूंना ते देव मानून त्यांची पूजा करत असत.म्हणून आदिवासी माना जमात *नागपंचमी* या सणाला आपले तिसरे प्रमुख सण म्हणून ओळखतात..

बोरडा (सराखा) या गावी नागपंचमीची एक आगळी वेगळी परंपरा दिसून येते.या दिवशी गावातील काही लोकं मंदिरामध्ये एकत्र येऊन शेष नागाचे गाणे म्हणतात..प्रत्येकाच्या घरी नागाचे चित्र कोरून त्याची पूजा केली जाते.कुणी कुणी उपवास सुद्धा करतात..तर प्रत्येकाच्या घरी जेवणात गव्हापासून तयार केलेला घाटा आणि सोबत चण्याचा उसळ केल्या जाते..

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …