*थेट गु्हमंत्री व पालक मंत्र्यांच्या रेती घाटावर धाडीं नंतर ही रेतीचा उपसा सुरुच* *रात्रीच्या काळोखात मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा गोरखधंदा*

*थेट गु्हमंत्री व पालक मंत्र्यांच्या रेती घाटावर धाडीं नंतर ही रेतीचा उपसा सुरुच*

*रात्रीच्या काळोखात मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा गोरखधंदा*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*नागपूरगृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांना जिल्ह्यातील अवैध रेतीघाटांवर छापे टाकून माफियांना सूचक संदेश द्यायचा होता की, राजकीय विरोधकांना शह देण्यासाठी ‘कात्रजचा घाट’ दाखवला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.*

*जिल्ह्यातील रेतीतस्करीचा मुद्दा नवीन नाही. बहुतांश घाट परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रेती चोरी केली जाते हे उघड सत्य आहे. अनेक वर्षांपासून राजरोसपणे हा धंदा सुरू आहे. अधिकाऱ्यांवर हल्लेही झाले. नेत्यांचे आशीर्वाद व राजकीय पाठबळाखेरीज रेतीची दिवसाढवळ्या तस्करी शक्य नसल्याचे बोलले जाते. मात्र, यावर कुणीही उघडपणे बोलले नाही वा कुणावर कारवाई झाली. पहिल्यांदाच जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी छापामार कारवाई केली, हे विशेष.*

*गेल्या काही महिन्यांतील रेतीचोरी व अन्य घटनांवर अंकुश लावण्यासाठी आलेल्या तक्रारींवर गृहमंत्री अनिल देशमुख तत्काळ पाऊल उचलले. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत त्यांनी छापामार कारवाई केली. करोनासारख्या संकटकाळात अचानक रेती माफियांविरोधात दोन मंत्र्यांनी गुप्तता बाळगत दौरा केल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत असले तरी, रेती माफिया बिळात गेल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.*

*खापा व कन्हान येथे मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा सापडला. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा समर्थक असलेल्या नगरसेवकाकडे सात ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि मजूर उपस्थित असल्याचे विश्वसनीय वुत्त असुन अन्य घाटांवरही असे चित्र दिसून आले. मंत्र्यांच्या कारवाईमुळे रेतीतस्करांशी हितसंबंध असलेल्या विविध पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे.यात एका मोठ्या ठगबाजा सोबतच अनेकांची या अवैध रेती व्यवसायात भागिदारी असल्याचे बोलले जात असून या कारवाईमागे विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

*नागपूर जिल्ह्यात भंडारा व शेजारच्या मध्य प्रदेशातील रेती माफियादेखील सक्रिय आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातील वाहने दिसल्यास कुठलीही गय न करता कठोर कारवाई करावी, अशी तंबी गृहमंत्र्यांनी दिली. उमरेड येथे त्यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनाही बोलावले होते. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनालादेखील बळ मिळाले असल्याची कबुली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.*

*रेतीमाफीयां दिवसा बिळात तर काळोखात सक्रीय, नेते मंडळी नाराज*

*सुर्योदय ते सुर्यास्त असा उत्खनन व परिवहनाचा नियम असुन त्याच कालावधीत रेतीघाटावरूण रेतीची उचल करण्यात येण्याची परवानगी असुन सुध्दा कन्हान नदिच्या सर्वच घाटावरून मंत्री महोदयाच्या धाडीपुर्वी चौवीस तास सुरू असणारे अवैध उत्खनन व परिवहन मंत्री महोदयाच्या आकस्मिक धाडीनंतर दिवसा जरी रेती घाटावर शुकशुकाट दिसत असला तरी रात्री 9-00 च्या नंतर सर्व घाट प्रकाशाच्या उजीडाने नाहुन निघते व सुरु होतो अवैध रेती उपस्याचा खेळ व रात्रीच्या काळोख्यात खापा पोलीस स्टेशन च्या पुढुन राजरोसपणे अवैध परिवहन होत असल्याने मंत्री महोदयाच्या सदर धाडीचे औचित्य काय असा सवाल जनसामान्यांतून उठत असुन नेते मंडळीत नाराजी चा सुर पणपत आसल्याचे विश्वसनीय सुत्र आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …