Breaking News

*पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातशेतकऱ्यांना लोखंडी बखर, फास चे वाटप*

*पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातशेतकऱ्यांना लोखंडी बखर, फास चे वाटप*


रामटेक तालूका प्रतिनिधी -ललित कनोजे

रामटेकपेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या घोटी गावामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास समिती घोटी (मोठी ) व्दारा शेतकऱ्यांना लोखंडी बखर, फास चे वाटप करण्यात आले. पिकाच्या मशागती करिता ह्या साहित्य ची नितांत गरज असते. पारंपरिक पद्धतीने शेतकरी हे साहित्य लाकडापासून तयार करत असल्यामुळे जंगलावर अधिक ताण येई व किती तरी वृक्षाची कत्तल व्हायची यामुळे पर्यावरण असंतुलित होत आहे यावर पर्याय म्हणून लोकांनी लाकडी साहित्य वापर थांबवून पर्यायी लोखंडी साहित्याचा वापर केल्यास वृक्षाची कत्तल थांबेल व पर्यावरण संतुलित राहील.


 दिनांक 24 जुलै 2020 रोजी समिती मार्फत गावातील 48 शेतकरी लाभार्थ्यांना मा. वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे ह्यांच्या हस्ते लोखंडी अवजारांचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र वरखंडे, सचिव वनरक्षक जीवन कदम , पोलीस पाटील लांजेवार, समिती सदस्य, श्री. निशाल सहारे, श्री. रमेश उईके, श्री. झनकलाल मर्सकोल्हे, श्री. अरुण वरकडे, श्रीमती. पुष्पा सयाम, श्रीमती. शालू लांजेवार व गावातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …