*वर्धा आगमनापित्यर्थ पालकमंत्री सुनिलबाबू केदार यांनी राज्यपालांचे स्वागत*

*विशेष प्रतिनिधी वर्धा*
वर्धा – आज महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांचे वर्धा आगमनानिमित्य वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वागत केले.*

*संपूर्ण भारातदेशातील श्रद्धास्थान सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या सहवासाने पावन झालेल्या बापू कुटी आश्रमात माननीय राज्यपाल यांनी भेट दिली. त्यानंतर गोपुरी येथील गीताई मंदिर, मगनवाडी गिरी, विनोबा भावे यांचे पवनार आश्रम येथे महामहिम राज्यपाल महोदयांनी भेटी दिल्या.*

*प्रथमच वर्धा जिल्ह्यात महामहिम मा.राज्यपालांचे आगमनापित्यर्थ महाराष्ट्र शासनाचे दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री सुनील बाबू केदार यांनी सेवाग्राम आश्रमात मा.राज्यपालांचे स्वागत करुन त्यांना स्मृतीचिन्ह देऊण स्वागत करण्यात आले.राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पावन सानिध्य लाभलेले सेवाग्राम आश्रम तसेच थोर समाजसुधारक विनोबा भावे यांच्या आश्रम या पवित्र ठीकाणाचे महत्व अजरामर असून सदर दोन्हीही आश्रमात येऊण थोर राष्ट्रपुरुषांचे आशिर्वाद प्राप्त करण्याची संधी मला मीळाली असे मत मा.राज्यपालांनी व्यक्त केले*
Maharashtra News Media सच की आवाज