*कळमेश्वर शहरात कोरोना ब्लास्ट*
*एकूण रुग्ण संख्या 20*
*पोलिस कर्मचाऱ्यांसह,ग्रामीण च्या तीन रुग्णांचा समावेश*
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी
कळमेश्वर– कोरोना रूग्णाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कळमेश्वर शहरात कोरोना रुग्णांचा स्पोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचा विषय निर्माण झाला आहे कळमेश्वर शहरातील कोरोना रुग्णसंख्या आज दिनांक 26 जुलै रोजी 17आणि उर्वरित ग्रामीण भागातील 3अशी एकूण 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वांची तपासणी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे करून त्या सर्वांना सावनेर रोड वरील कोविड सेंटर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली प्राप्त माहितीनुसार ब्राह्मणी येथील 22 वर्षीय सलून व्यवसायिक काही दिवसा अगोदर पॉझिटिव्ह मिळून आला होता त्याच्या संपर्कातील त्याचा तालुक्यातील भडांगी गावातील मित्राची चाचणी केली असता तोही पॉझिटिव्ह मिळून आला भडांगी येथील यूवकाच्या काच्या घरी नुकतीच बचत गटाच्या महिलांची मीटिंग झाल्याची माहिती आहे आज दिवसभर भडांगी गावातील परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू होती. आज परत दोघांच्याही दुसऱ्यांदा चाचण्या केल्या असता दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्याचप्रमाणे कळमेश्वर शहरात जे एस डब्ल्यू या नामांकित कंपनीत काम करणारे पाच कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जे एस डब्ल्यू कॉलनीतील एका कर्मचार्या सह त्याची मुलगी हिचा रिपोर्टही पॉझिटिव आला त्यामुळे कंपनीत काम करणारे एकूण रुग्णांची संख्या सात झाली आहे.कंपनीत काम करणारे पाच कर्मचारी हे दररोज कंपनीमध्ये नागपुर वरून ये-जा करीत असतात तर कळमेश्वर शहरातील औद्योगिक वसाहतीतील वार्ड क्रमांक 15 येथील तीन, वार्ड क्रमांक तेरा होरे लेआउट येथील 3औद्योगिक वसाहतीतील सेलु रोड परिसरातील 1 वार्ड क्रमांक 7 येथील एक महिला असे एकूण कळमेश्वर शहरातील 17 रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निमजी, ग्रामपंचायत ऊबगी असे एकूण 2 असे एकूण 20 रुग्ण कळमेश्वर शहर आणि ग्रामीण भागात पॉझिटिव्ह मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या रुग्णांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे.या सर्वांवर ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचार करून त्यांना सावनेर रोड वरील कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले आज दिवसभर रुग्ण सापडलेला संपूर्ण परिसर कन्टोनमेंट करण्याची प्रक्रिया तालुका प्रशासन आणि पालिका प्रशासन कडून करणे सुरू होते कन्टोनमेंट करण्यासाठी तहसीलदार सचिन यादव, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक , पालिका मुख्याधिकारी स्मिता काळे,नायब तहसीलदार प्रशांत गड्डम ,ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अमरीश मोहब्बे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक कुलकर्णी ,बिलाल खान ,सचिन जाधव ,गव्हाणकर ,योगेश नगराळे यांच्यासह पोलिस तहसील आणि पालिका प्रशासना कडून दिवसभर कन्टोनमेंट कारवाई आणि परिसर सील करण्याची कारवाई सुरू होती.
Maharashtra News Media सच की आवाज