Breaking News

*ग्रामीण भागातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून AIIMS ची पहिली आरोग्य सेवा*

*ग्रामीण भागातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून AIIMS ची पहिली आरोग्य सेवा*

बेला प्रतिनिधी दिलीप घिमे
उमरेडतालुक्यातील बेला सर्वात मोठे गाव .गावाची लोकसंख्या 20 हजारच्या आसपास बेला प्राथमिक आरोग्य केंद्राने महाराष्ट्र शासनाचे आरोग्य अनेक पुरस्कार आपल्या कडे खेचून आणले त्यात नॅशनल कॉलिटी इन्शुरन्स सन 2019 ज्योती पुरस्काराने सन्मानित 2020 ला आरोग्य सेवाचा प्रथम पुरस्कार, ISO नामांकन मिळालेले महाराष्ट्रातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळख झाली. नागपूर जिल्ह्यातील उत्तम रुग्णसेवा आणि उत्कृष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून बेला येथील आरोग्य केंद्राने जिल्ह्यात नाव लौकिक व मान मिळविला डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार सन 2020 , बेला प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव संपूर्ण जिल्ह्यात “उत्तम आरोग्य केंद्र” म्हणून मान मिळाला. आणि महाराष्ट्रातून ग्रामीण भागात पहिल्यांदा हा मान उमरेड तालुक्यातून बेला गावाला मिळाला हा बेल्यासाठी फार मोठा बहुमान आहे अशी चर्चा परिसरातील जनतेमध्ये आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, (AIIMS) नागपूर केंद्र शासनाच्या अखात्यातील संस्था यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेला ता. उमरेड जिल्हा नागपूर येथील खाटा शैक्षणिक प्रयोजनाकरिता निशुल्क वापरण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली असून सध्यास्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र बेला येथेच उत्तम आरोग्य सेवा जनतेला देण्याकरिता प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर चमू येणार असून बेला व बेला परिसरातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे. मात्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच बाह्य रुग्ण (ओ. पी.डी.) सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहे आणि कायम स्वरूपी AIIMS सुरू करण्याकरिता ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेची जागा (जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची) मंजूर करण्यात आली आहे. अश्याप्रकारे नवीन इमारत बांधून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु दिनांक 23 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर ही केंद्रशासनाच्या अखत्यारीतील संस्थेची आरोग्य सेवा जनतेला देण्याकरिता सदर संस्थेस प्राथमिक आरोग्य केंद्र बेला ता.उमरेड जिल्हा नागपूर येथील खाटा शैक्षणिक प्रयोजनाकरिता निशुल्क वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत ही सेवा बेला प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रातून तात्काळ सुरु करून उत्तम आरोग्य सेवा जनतेला देण्यात येणार आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …