Breaking News

*आर्वी तील स्थानिक प्रशासनातर्फे आदेश धडकला* *आर्वी नगरपरिषदेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व त्यांच्या दवाखान्यातील कर्मचारी, औषध विक्रेता व त्यांच्या दुकानातील कर्मचारी, भाजीपाला विक्रेता, दुध विक्रेता, किराणा विक्रेता व अन्य दुकानदार यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले*

*आर्वी तील स्थानिक प्रशासनातर्फे आदेश धडकला*

*आर्वी नगरपरिषदेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व त्यांच्या दवाखान्यातील कर्मचारी, औषध विक्रेता व त्यांच्या दुकानातील कर्मचारी, भाजीपाला विक्रेता, दुध विक्रेता, किराणा विक्रेता व अन्य दुकानदार यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले*

आर्वीआज दि २७/०७/२०२० रोजी रात्री १२:३० वाजता आर्वी तील स्थानिक प्रशासनातर्फे आदेश धडकला.
त्या आदेशात आर्वी नगरपरिषदेच्या क्षेत्रात दि. ३०/०७/२०२० रात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे, असे नमूद केले होते. तसेच आर्वी नगरपरिषदेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व त्यांच्या दवाखान्यातील कर्मचारी, औषध विक्रेता व त्यांच्या दुकानातील कर्मचारी, भाजीपाला विक्रेता, दुध विक्रेता, किराणा विक्रेता व अन्य दुकानदार यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले होते. व चाचणी न केल्यास व्यवसाय करण्यात प्रतिबंध करण्यात येईल व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेदेखील नमूद केले आहे.

सगळ्यात पहले कोणताही आदेश किंवा परिपत्रक काढण्याच्या कमीतकमी २४ तासांअगोदर लोकांना कल्पना द्यावी लागते. आणि लोक झोपलेले असतांना रात्री १२ च्या सुमारास आदेश येतो, भोंगा फिरतो म्हणजे काय मजाक लावली आहे का लोकांची?
आणि राहिले टेस्ट च! कोरोनाची कोणती टेस्ट करणार आहेत, काही खुलासा नाही. का करणार आहोत, काही माहिती नाही. ज्या लोकांना काही त्रास आहे त्याची करणार आहोत कि सगळ्यांची करणार आहोत, काहीही माहिती नाही.

 

बरं टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय निगेटिव्ह आली तर काय? काही नमूद केलेले नाही. उगाच लोकांना घाबरून टाकायच. टेस्ट करण्याबद्दल त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घेतला होता का?? काही उत्तर नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे आर्वी तील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . या सर्व प्रश्नांची उत्तरे आर्वी तील जनतेला मिळाली पाहिजे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …