Breaking News

*कवडक ( दुधाळा ) येथे घरफोडी मामला* *तीन चोरटयांना अटक* *१.४६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत रामटेक पोलीसांची कारवाई*

*कवडक ( दुधाळा ) येथे घरफोडी मामला*

 

*तीन चोरटयांना अटक*

*१.४६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत रामटेक पोलीसांची कारवाई*

रामटेक विशेष प्रतिनिधि

रामटेकरामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवडक ( दुधाळा ) येथे घरफोडी करणार्‍या तीन चोरटयांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला . घरफोडीची ही घटना २४ जुलैला घडली होती. हर्षल धनराज कोटांगले ( २२ , रा. विनोबा भावे वार्ड रामटेक ), महेश गोविंदराव गायधने(२१) , व पीयुष गजानन भरणे (३०) दोघेही रा.रामाळेश्वर वार्ड , रामटेक अशी अटकेतील अारोपीची नावे अाहेत.फिर्यादी अपर्णा जयेंद्र वासनिक (३०) रा. कवळक दुधाळा ता. रामटेक यांच्या तक्रारीवरुन रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञात अारोपीविरुध्द गुन्हा नोंदविल्यानंतर या प्रकरणाचा रामटेक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु होता. गुप्त माहीतीच्या अाधारे तपासादरम्यान ही घटना उघडकीस अाली. यातील चोरी करणारा अल्पवयीन अाहे. यामध्ये चोरीचा ऐवज स्वीकारणारा ज्वेलर्सचा मालक तसेच चोरीचा इतरमुद्देमाल ताब्यात घेत अटक केली अाहे. त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत,४५ हजारांच्या लहान-मोठ्या पाच नग अंगठ्या, २० हजाराचे दोन लहान पेंडंट व एक हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.तिन्ही अारोपीना अटक करण्यात अाली.सदर कारवाई पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात परि.पो.उपनि एस.जी.बेद्रे , सपोनि शेडगे , सपोनि भुते, पोउपनि बारंगे , पोशि मारबते यांनी केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …