Breaking News

*लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुर शहरात सेवा सप्ताह.* *अध्यक्ष सौ .संध्या गुरनुले यांनी दिली सेवा केंद्रला भेट*

*लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुर शहरात सेवा सप्ताह.*

*अध्यक्ष सौ .संध्या गुरनुले यांनी दिली सेवा केंद्रला भेट*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे 

चंद्रपूर :- सोमवार, दि. २६ जुलै. राज्याचे माजी अर्थ व नियोजन तथा वनेमंत्री, विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी बल्लारपुर यांचेवतीने शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने, आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी या सेवा केंद्राला भेट देऊन नागरिकांना आर्सेनिक अल्बम – 30 होमिओपॅथी औषध व माॅस्कचे वाटप केले.
यावेळी, बल्लारपुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरीशभैय्या शर्मा, भाजपा शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, संजय बाजपेयी, गुलशन शर्मा, घनश्याम बोरडकर, अॅड. रणांजय सिंह, ममता बोजा, अर्चना हिरे, आरती आक्केवार यांसह आदी मंडळी उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …