*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*पावडदौना येथे विद्यार्थ्यांचा सत्कार*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील पावडदौना येथे इयत्ता बारवीत विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ दि.२७ जुलै रोजी संपन्न झाला.
युवासेना मौदा तालुका च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय अनेक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी युवासेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे हे होते. उद्घाटक निळकंठ भोयर तर शिवसेना शाखा प्रमुख गणेश तिवाडे, माजी ग्रा.पं.सदस्या, विमल गेडेकार, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर भोयर, बंडूजी तिवाडे, अतुल भोयर, मनोहर देशमुख, अमित तिवाडे, रुपचंद वैद्य, रामा सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुजाता तिवाडे, होशिका गेडेकार, कांचन भोयर, पूजा शेंडे, रुपेश भोयर, सिद्धू शेंडे, अविनाश हटवार, राकेश बोरकर, हर्षल गेडेकार आदि विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना शाखा प्रमुख स्वप्नील भोयर यांनी. तर आभार अभिषेक बडे यांनी मानले.
Maharashtra News Media सच की आवाज