Breaking News

*उजागिरीने विकल्या जाते दारू, पण चहा मात्र विकल्या जाते चोरून*

*उजागिरीने विकल्या जाते दारू, पण चहा मात्र विकल्या जाते चोरून*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे लाँकडाऊन करण्यात आले. आणि मागील चार महिन्यापासून कमी जास्त प्रमाणात काही बाबतीत शिथिलता देण्यात आली. लाँकडाऊनच्या काळात ट्रान्सपोर्ट, दारु दुकाने, मॉल्स, हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. परंतु हळूहळू काही व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली.

शासनाचा महसूल बुडतो या सबबीखाली सुरवातीला दारू दुकाने बार उघडण्याची परवानगी अटी शर्थीवर देण्यात आली. पण फुटपाथवर चहाचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चहा दुकानाला अजूनही परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आज अनेक दुकानदार उजागिरीने चहा विक्री करू शकत नाही.

आज ग्रामीण भागात अनेक चहा दुकानदार आपल्या घरी चहा तयार करून थर्मास मध्ये भरून प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून ग्राहकाकडे पोचवून त्यांची चहाची तलफ पूर्ण करताना दिसत आहेत. अनेक व्यवसायिक आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाला किंवा नोकरांना दुपारचा चहा प्यायचा असल्यास चहा विक्रेत्याला फोन करून चहा मागवताना दिसताहेत. अश्या प्रकारे आज तालुक्याचे ठिकाणी आणि गावखेड्याच्या चहा विकला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आज कोरोनाच्या काळात उजागिरीने विकली जाते दारू आणि चहा मात्र प्यावा लागतो चोरून अशी परिस्थिती कोरोनाच्या या लाँकडाऊन काळात पाहायला मिळते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …