Breaking News

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वर्धा जिल्हा व तालुका कार्यालयाचे उद्घाटन* *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वर्धा जिल्हा व तालुका कार्यालयाचे भिम टायगर चे शहर प्रमुख विशाल रामटेके यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न!*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वर्धा जिल्हा व तालुका कार्यालयाचे उद्घाटन*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वर्धा जिल्हा व तालुका कार्यालयाचे भिम टायगर चे शहर प्रमुख विशाल रामटेके यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न!*

प्रतिनिधी- पंकज रोकडे
वर्धा विश्वरत्न,संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा व संकल्पना भारत देशातच नव्हे तर संपुर्ण राष्ट्रात पोहचावी हाच गतिमान उपक्रम!याच उपक्रमातुन आज २७ जुलै २०२० रोजी, दुपार नंतर ३.०० वाजता वर्धा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)पक्षाच्या जिल्हा व तालुका कार्यालयाचे उद्घघाटन भीम टायगर सेना संघटनेचे शहर प्रमुख आंबेडकरी विचारक विशाल रामटेके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भीम आर्मी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आशिष सोनटक्के,समता सैनिक दलाचे मार्शल प्रविण पोळके,रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर,जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ.भारतीताई थुल,आंबेडकरी कार्यकर्ता जयकांत पाटील,प्रकाश कांबळे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू थुल,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष कैलास इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांचा स्मृति दिन,तसेच रिपाइं (ए) पक्षाचा ३० वा वर्धापण दिन व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जिल्हा व तालुुका कार्यालयाचा उद्वघाटन कार्यक्रम पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने,वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी आयोजित केला.कोरोना विषाणू महामारीच्या लॉकडाऊन नियमाचे पालन करुन भारताचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिव्हिल लाईन येथील पुतळ्याला अभिवादन व महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रम संपन्न झाला.
वर्धा तालुका अध्यक्ष सुनिल वनकर यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.सर्वांचे आभार जिल्हा संघटक समाधान पाटील यांनी मानले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …