*ओम श्री लक्ष्मीनारायण विद्या मंदिर हुडकेश्वर चा निकाल 100%*
*ओम श्री लक्ष्मीनारायण विघा मंदीर शाळेतुन पुनम अमृत खडसे पहिली*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*नागपुर:- मार्च 2019 – 2020 या सत्रात नागपूर माध्यमिक महामंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेत ओम*
*श्री लक्ष्मीनारायण विद्यामंदिर हुडकेश्वर रोड नागपूर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक गजानन उमरेडकर नलिनी उमरेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया भुरे यांनी अभिनंदन केले.

पुनम खडसे हिने 91 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकवीला तर खुशी कानडे, सलोनी जयस्वाल, तृप्ती धर्माळे, तन्मय राक्षसकर या व्यतिरिक्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले*.

*अपंग विद्यार्थ्यांमधून केशव वर्मा या विद्यार्थ्यांने यश संपादन करुन शाळेचे नाव उज्ज्वल केले. विज्ञान विषयात तीन विद्यार्थी, गणित विषयात दोन विद्यार्थी तर सामाजिक शास्त्र तीन विद्यार्थी तर मराठी मध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे शिक्षक वृंद व आई वडिल यांनी अभिनंदन व कौतुक केले भविष्यात ही असेच यश संपादन करा अशी आशा व्यक्त केली*
Maharashtra News Media सच की आवाज