*संग्रामपूर येथील वार्ड क्रमांक पाच रस्त्याचे कामाबाबत नगरपंचायत ला निवेदन*
संग्रामपूर प्रतिनिधि- नंदकिशोर शिरसोले
संग्रामपूर – येथील वार्ड क्रमांक पाच मधील रस्त्याचे काम पूर्ण करावे याकरिता संग्रामपुर येथील नागरिक यांनी आज नगरपंचायत ला निवेदन दिले .निवेदनात नमूद आहे की आम्ही संग्रामपुर येथील कायम रहिवाशी असून वार्ड क्रमांक पाच मध्ये राहतो आमच्या घरा समोरील रस्ता हा बांधकामाकरिता मागील दोन महिन्यापासून खोदून व त्यावर निकृष्ट दर्जाचे फक्त गिट्टी टाकून तसेच पडलेले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील सर्व नागरिकांना जाण्या-येण्यात मोठ्या प्रमाणात काटेची कसरत करावी लागत आहे .नागरिक स्वतःचे गाडीने बरेच वेळा या रस्त्यावरून पडलो .संबंधित ठेकेदार या रोडचे काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे .तरी संबंधित रस्त्याचे बांधकाम 15 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण करावे .
जर काम पूर्ण होत नसल्यास आम्हाला पुढील आंदोलनाची प्रक्रिया करावी लागेल. निवेदनावर संतोष रामराव घिवे ,विश्वनाथ श्रीराम नाहीसे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज