Breaking News

*पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी या शाळेचा निकाल 100% पूर्ण…* *खुमारी येथील मुलगा प्रथम,तर बोरडा येथील मुलगी द्वितीय.*

*पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी या शाळेचा निकाल 100% पूर्ण…*

 

*खुमारी येथील मुलगा प्रथम,तर बोरडा येथील मुलगी द्वितीय.*

मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी

मनसरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत रामटेक तालुक्यातील पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी या शाळेचा निकाल 100% लागले..ही बातमी गावातील नागरिकांकरिता व शाळेच्या सर्व शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे.यशस्वी मुलांनी नियमित प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या प्रगतीची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.यामध्ये प्रथम क्रमांक कु.शुभम कन्हैया भरडे रा.खुमारी याने 86.60 टक्के प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावले. तर कुमारी.मैविष भोजराज ठाकूर रा.बोरडा हिने 80.00 टक्के घेऊन व्दितीय क्रमांक प्राप्त केले.व कु.अतुल मच्छिंद्र लेंडे रा.सराखा याने 79.00 टक्के घेऊन तृतीय क्रमांक घेतला.तसेच कु.भेनिकेश निळकंठ बरयेकर यानी 76 टक्के घेऊन चौथा क्रमांक घेतला.या सर्वांना शाळेच्या मुख्याध्यापिका गौडिया मॅडम,सहाय्यक शिक्षक बरयेकर सर व इतर सर्व शिक्षकांनी त्यांच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या..

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …