Breaking News

*जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल 100,%* *संचालक अँड चंद्रशेखर बरेठीया व मुख्याध्यापक पांडव यांनी विद्यार्थ्यांना दिल्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा*

*जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल 100%*

*संचालक अँड चंद्रशेखर बरेठीया व मुख्याध्यापक पांडव यांनी विद्यार्थ्यांना दिल्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा*

सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया 

*सावनेर: नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी मार्च 2020 च्या निकालाची स्थानिक जवाहरलाल नेहरू विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल प्राप्त केला.*

*साक्षीला व्हायचं डॉक्टर*

*कुमारी साक्षी सुनील आडुळकर या विद्यार्थिनीने 96.60% गुण प्राप्त करून विद्यालय विद्यालयातून नव्हे तर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तीने आपले आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना सोबतच आई बाबा आजी आजोबा व आपल्या आप्त परिवारास देत पुढे तीला डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याचा निर्धार असल्याचे व्यक्त केला*

*तर शेतकरी कुटुंबातील हलाखीच्या परिस्थीतीवर मात करत हिमांशू रमेश बीरे यांनी 96.20% गुण प्राप्त करुन द्वितीय स्थान प्राप्त करत आपल्या गुरुजनांचा तर मान वाढविलाच सोबतच शिक्षण हे महालमाड्या मधेच राहुन घेतल्या जाते हा गैरसमज दुर सारत झोपडीतल्या दिव्यातही प्रकाश असतो आचे ठोस उदाहरण देत भविष्यात आएस अधिकारी होऊण जिल्हाधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला*

*तर खुशी जीवतोडे व पायल खराबे या दोन्हीही विद्यार्थींनींनी 94/20 टक्के गुण अर्जीत करुण संयुक्तरीत्या त्रीतीय क्रमांक पटकावत आपल्या शाळेची गुणवत्ता प्राप्तीची परंपरा कायम ठेवत पुढील भविष्यात अभियंत्रीकी क्षेत्रात पुढे जाण्याची तयारी दर्शविली आहे*

*विध्या शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर व्दारा संचालीत जवाहरलाल नेहरू विद्यालय सावनेर चे यावर्षी 105 विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी 53.33% विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 36.19% प्रथम श्रेणी तर 0.8% द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले. सर्व यशस्वी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन व्हावे व त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे संचालक अँड्. चंद्रशेखर बरेठीया, मुख्याध्यापक किरण पांडव आदिंनी पुष्पगुच्छ देऊन शूभेच्छा दील्या.याप्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पालकवर्गा सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही उपस्थित राहुन यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या*

*याप्रसंगी आपले मत व्यक्त करत शाळेचे संचालक अँड् चंद्रशेखर बरेठीया यांनी म्हटले की विध्या शिक्षण प्रसारक मंडळाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना पुढे आणून त्यांना दर्जेदार शिक्षण,संस्कार देऊण समाजातील ग्रामीण व शहरी ही विषमता दुर करण्यासाठी मागील 25 वर्षांपासून आमची संस्था परिश्रम करीत आहे व ते पुढे ही सुरु राहील असे मत व्यक्त केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …