*शहरातील हाँटस्पाँट बनलेल्या साई मंदिर परिसरात भीतीचे सावट*
*कंटोनमेंट झोन मधे इतर परिसातील नागरीकांची सर्रासपणे ये…जा*
*प्रशासनाचा वचक नसल्याचा नागरिकांचा आरोप*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः आज जिथे संपूर्ण जगात हाहाकार माजविणारा कोविड-19 कोरोना याने भारतात सुद्धा रौद्र रूप धारण केलेले आहे, दिवसे न दिवस हा संसर्गजन्य आजार आपले पाय पसरवीत असून शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांची संस्था दररोज झपाट्याने वाढत असून आता या आजाराने दगावणार्याची संख्या ही वाढत आहे.*
*अशी परिस्तिथी असतांना देखील कही मंडळी अक्षरशः लापरवाही करत स्वताच्या व जनतेच्या जीवनाशी खेळत आहे*
*सावनेर शहर हे कोविड-19 रुग्ण संख्येत मध्ये नागपूर जिल्ह्यात 3 क्रमांकावर आहे असे असून सुद्धा इथली प्रशाशन व त्याची व्यवस्था निद्रा अवस्थेत असुन कुचकामी ठरत असल्याचा आरोप साई मंदिर परिसरातील नागरिक करत आहे*
*शहरातील हाँटस्पाँट साई मंदिर परिसर*
*सावनेर शहरातील साई मंदिर हे हॉट स्पॉट चे ठिकाण त्या परिसरात जवळपास 9 एक्टिव्ह रुग्ण मिळाले असुन त्या परिसरास दुसर्यांदा सील करण्यात आले आहे.असून तेथील काही रुग्णावर नागपूरच्या हॉस्पिटल मधे उपचार होऊण त्यांना घरीच होम कोरंटाईन करण्यासाठी रवाना केरण्यात आले परंतू परत आलेल्याला पेशंट चे रेड झोन मध्ये जाऊन काही मीत्र मंडळीं त्याचे जल्लोषात स्वागत करत आहे.*
*महत्वांचे म्हणजे स्वागत करणारे हे हायरिस्क होम कॉर्नटाईन असुन सदर परिसराच्या बाहेर रहातात तरी हे लोक कोणाच्या परमिशने रेड झोनच्या आत जाऊन स्वागत करीत आहे*
*सदर घटनेची प्रशासनाला माहिती नाही का हे लोक होम कॉर्नटाईन असून मोकाट बाहेर फिरत आहे म्हणून नागरिकांमधे विषेशतः साई मंदिराच्या परिसरालागत असलेल्या मधे भीतीचे वातावरण निर्माण तर झालेला आहे, सदर लोकं इतरांच्या संपर्कात येवून हा रोग पसरण्याची भीती नागरिकांतून वक्त करण्यात येत आहे तरी प्रशाशनाचे इकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.अन्यथा सावनेर शहरात कोरोणा विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांची संख्या वाढून सावनेर शहर नागपूर जिल्हातील कामठी तालुका बनण्यात काहीच वेड लागणार नाही*
*अशावेळी प्रशासनाने वेळे वर लक्ष देऊन ताबडतोब दोषींवर कारवाही करून नंतर अश्या घटनांची पुणरावु्ती होणार नाही व जनतेच्या आरोग्याची कोणी खेळनार नाही याची उपाय योजना करून दक्षता घेण्यात यावी व कठोर शासन व्हावे अशी मागणी साई मंदिर परिसर व लागतच्या परिसरातील नागरिकांनकडून होत आहे*
*असले कु्त्य खपवून घेतल्या जाणार नाही*– रविंद्र भेलावे
*रुग्ण बरा होऊण घरी परतणे ही आनंदाची बाब आहे परंतू आपल्या आनंदामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार याची जान असने गरजेचे आहे.शहरातील साई मंदीर परिसरात घडलेला हा प्रकार नक्कीच नागरिकांना संताप आणनारा असुन स्थानिक प्रशासन याची दखल घेऊन पुढे असे कुत्य होणार नाही व असा प्रकार करणार्यांची गय केल्या जाणार नसुन त्यांच्यावर योग्य दंडात्मक कारवाई केल्या जाणार असल्याची माहीती नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रविंद्र भेलावी यांनी दीली*