*सावनेर शहरात कोरोना ब्लास्ट*

*आज शहरातील10 व ग्रामीण 2 असा बारा रुग्णांचा रिपोर्ट पाँजेटिव्ह*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः कोरोना विषाणूंची लागन ही झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे.
*मिळालेल्या अधिकारीक माहिती नुसार दि.28 व 29 जुलै रोजी झालेल्या आरटीपीसीआर चाचनीचा अहवाल आज सावनेर कार्यालयात येताच त्यातील सावनेर शहरातील 10 व ग्रामीण 2 असे एकुण बारा रुग्णांचा रिपोर्ट एकाच दिवशी प्राप्त झाल्याने नगरवासीयात एकच धडकी भरली आहे*
*आज प्राप्त अहवालानुसार एक रुग्ण तालुक्यातील केळवद तर दुसरा निळगाव येथील असुन 2 रुग्ण आरोग्य विभागात कार्यरत नागपूर निवासी व ईतर 8 रुग्ण सावनेर शहरातील त्यातील ही डॉक्टर व त्या परिवारातील महिला,एक हेल्थ केअर वर्कर व एक पँथेलाँजी लँब संचालक असे आरोग्य विभागाशी निगडित असलेले असुन एक रुग्ण पांढुर्णा रोड वरील असुन ते राजस्थान वरुण आल्याची माहीती आहे तर माताखेडी वार्ड क्र.10,बस स्टँड मागील परिसर व खेडकर लेआऊट असे रुग्ण मीळालेले परीसर आहेत*

*काल दि.30 जुलै ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे झालेल्या आरटीपीसीआर टेस्ट चा रिपोर्ट अध्याप येणे शेष असुन त्यातून ही रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही*
*वाढत्या रुग्णांची संख्या बधता कुठेतरी प्रशासनाची दिरंगाइ व नागरिकांच्या लापरवाही मुळे हे घडत असल्याचे जरी निदर्शनास येत असले तरी उपविभागीय प्रशासन,तहसील प्रशासन,स्थानिक प्रशासन, तालुका आरोग्य व शहर आरोग्य विभागासह पोलीस विभागाचे पुर्ववत एकोपा व संयुक्तिक कारवाया करुणच अश्या वाढत्या रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण मीळवता येईल असे जाणकारांचे मत आहे*

*सावनेर तालुका व शहरासह इतरत्र वाढत्या रुग्ण संख्येवर आळा घालन्याचे कार्य जितके प्रशासनाचे आहे तितकेच नागरिकांचे सुध्दा आहे.त्याकरिता नागरिकांनी कोवीड़19 करिता शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करने तसेच अनावश्यक घरा बाहेर पडू नये व गर्दीचे ठीकाण टाळावे अशी विनंती तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रविंद्र भेलावे,कोवीड़19 चे प्रबंधक डॉ भुषण सेंबेकर, डॉ. संदीप गुजर,नगर पालिका सावनेर चे अतुल गावंडे.पंकज छेनीया,नितीन चाचरकर,आदिंनी केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज