*कोरोना प्रसंगी यु जी सी अंतर्गत सर्वच विद्यापीठां द्वारे ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण व ऑनलाईन परीक्षा यंत्रणेची व्यवस्था व्हावी 一 डॉक्टर राजेश ठाकरे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांना निवेदन*
शिक्षण हे सामाजीक ज्ञान व उपजीविके करिता व्यवहारिक ज्ञानाची योग्यता मिळवण्याचे साधन आहे तसेच देशाकरिता चांगला व सुसंस्कृत नागरिक बनविण्याकरिता एक व्यवस्था आहे 。 म्हणून ही शिक्षण व्यवस्था देशाकरिता आणि जगा करिता काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे अशातच जगात व आपल्या देशात कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झालं त्यामुळे शिक्षण पण व्यवस्था हेसुद्धा अडचणीत आली सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अंतिम सत्रा ची परीक्षा होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा न होताच पदवी प्राप्त होणे हे त्यांच्या आयुष्याला लागणाऱ्या डाग असं जाणवत असल्याने परीक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारचे मागणी अनेक विद्यार्थ्यांच्या द्वारे करण्यात येत आहे अशातच परीक्षा कशा घ्यायच्या हा मोठा प्रश्न प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विद्यापीठाला होत आहे 。
मागण्या:
सर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र च्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात तसेच या परीक्षा एक्झाम from कॉलेज किंवा एक्झाम from होम या आधारावर घेण्यात याव्या
परीक्षेचे माध्यम ऑब्जेक्टिव्ह आधारावर असावेत
मोबाईलवर सुद्धा त्यांना परीक्षा देता येईल याचीसुद्धा मुभा ठेवण्यात यावी
ही परीक्षा प्रत्येक विषयाची एक तासाची असावी परीक्षा पेपर मध्ये section1 ,
section2 ,section3 च्या उत्तराच्या वेटेज नुसार उत्तर सोडविण्याकरिता लागणारा वेळ हा निर्धारित करण्यात यावा याकरिता ऑनलाईन परीक्षा माध्यम घेण्याकरिता सॉफ्टवेअरची ची गरज आहे कारण सॉफ्टवेअरमध्ये ही सर्व व्यवस्था सॉफ्टवेअरमध्ये दिल्या जाऊ शकते ही परीक्षा खालील प्रमाणे यशस्वी होऊ शकते असा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर व शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक म्हणून डॉक्टर राजेश ठाकरे यांनी दावा केलेला आहे सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारची मुभा दिल्या जाऊ शकते यामध्ये अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयाचे किमान सहा विषय तज्ञ ची नियुक्ती करावी आणि हे विषय
तज्ञ प्रत्येकी पन्नास प्रश्न व त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्यांच्या आयडी पासवर्ड नुसार डाटाबेसमध्ये फीड करतील म्हणजेच एकूण तीनशे प्रश्न सहा विषय तज्ञ मिळून फीड करतील
तसेच ही तज्ञ मंडळी वर्क फ्रॉम होम या आधारावर कम्प्युटरवर डाटाबेस मध्ये त्यांना दिलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून प्रश्न व त्यांचे ऑब्जेक्टिव्ह फीड करतील जेव्हा परीक्षा ऑनलाईन चालू होईल त्यावेळेस तीनशे प्रश्नांपैकी कोणतेही शंभर प्रश्न रँडम ऑर्डर नी विचारले जातील त्यामुळे घर बसल्या जरी परीक्षा झाली तरी सर्वच विद्यार्थ्यांना सारखे प्रश्न येणार नाही त्यामुळे पाहून सोडण्याचा प्रश्नच येणार नाही कारण एक तासांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे याकरिता पुस्तक कॉपी करून तो पास होऊ शकणार नाही जो विद्यार्थी खरा अभ्यास करेल असाच विद्यार्थी या परीक्षेत पास होऊ शकेल परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता सर्व प्रश्नांचे डेमो पेपर म्हणून विद्यार्थ्यांच्या पुढे साधारणता पाचशे प्रश्नांचा डेमो पेपर प्रत्येक विषयाचा हा प्रॅक्टिस करिता उपलब्ध करून देण्यात यावा ज्याद्वारे कोणत्या प्रश्नाचे अचूक पर्याय कोणता आहे हे विद्यार्थ्यांना समजने सोयीचे होईल व सोबत सोबत यांचा अभ्यास सुद्धा परिपूर्ण होईल व परीक्षेची फॉरमॅट अर्थात परीक्षेचे स्वरूप सुद्धा त्यांना समजने सोयीचे होणार आणि परीक्षा द्यायला सुद्धा विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशी व्यवस्था जर झाली तर विद्यापीठ व शिक्षण व्यवस्था यामधील गरिमा कायम राहील व शिक्षण क्षेत्रातील शिस्त विद्यार्थ्यांचा स्वाभिमान कायम राहील 。
परीक्षा कण्डक्ट करण्याकरिता अर्थात सॉफ्टवेअरची व्यवस्था करून शंभर टक्के यशस्वी प्रोग्राम देण्याकरिता महाराष्ट्रातील एमकेसीएल या संस्थेसारख्या संस्थांना अर्थात ज्या संस्था ऑनलाईन परीक्षा राबवण्याचा पाच वर्ष पेक्षा जास्त अनुभव आहे अशा संस्थांना निमंत्रण देण्यात यावे जेणेकरून लवकरात लवकर परीक्षा घ्यायला सोयीचे होईल तसेच याकरिता प्रत्येक विद्यापीठांनी प्रत्येक शाखेच्या निवडक विषय तज्ञांना प्रश्न व ऑब्जेक्टिव्ह चे उत्तरे काढायला सुरुवात करायला सांगावे विद्यार्थ्यांना वृत्तपत्राद्वारे व इतर माध्यमाद्वारे परीक्षा ऑनलाइन होणार अशा प्रकारचा जाहीर सुद्धा करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांनी अभ्यास कंपल्सरी केला पाहिजे याकरिता त्यांना सुद्धा सोयीचे होईल आणि परीक्षा यंत्रणा राबविणारी कमिटी ही सॉफ्टवेअर यंत्रणेसोबत विषयाचे तज्ञ यांच्याकडून पेपर सेट करून घेतील याची व्यवस्था एकाबाजूला चालू ठेवावी यामुळे निश्चितच महिन्याभराच्या आत विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला सोयीचे होईल
MSc. computer, MA public administration, MBA, PhD., LLB 4th symester student अर्थात वीस वर्षाचे शैक्षणिक शिकवण्याचा अनुभव तसेच ऑनलाइन परीक्षेचा सुद्धा पंधरा वर्षाचा अनुभव यावरून अशी परीक्षा यशस्वीरीत्या घेतला जाऊ शकतील अशा प्रकारचा आत्मविश्वास डॉक्टर राजेश ठाकरे यांचा आहे
Maharashtra News Media सच की आवाज