*ग्राम तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने मजरा( खुर्द ) येथे प्रेमविवाह संपन्न*
वरोरा प्रतिनिधी मूजम्मील शेख
वरोरा- दिनांक 1 ऑगस्ट 2020 ला मजरा खुर्द तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेम विवाह पार पडला. मौजा सालोरी येंन्सा ब्लॉक मजरा खुर्द येथील सुरज सुनील दाते यांचा मानसी भाग्यवान सोनुरले राहणार मोहुर्ली तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर हिच्यासोबत ग्राम तंटा मुक्त समिती मजरा खुर्द च्या पुढाकारातून दोन जीवनाचे मीलन घडवून आणले. मजरा येथील युवकाचे मोहरली येथील युवतीशी ओळखीतून प्रेम संबंध जुळुन आले. अशातच प्रेम बहरत गेले दोघांना एकमेका शिवाय करमेना. त्यांनी लग्न करून एकत्र राहण्याचा रीतीरिवाजाप्रमाणे सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ ग्राम तंटामुक्त समिती मजरा खुर्द च्या अध्यक्ष सारिका मोहन धाबेकर यांच्याशी संपर्क साधला व लग्न लावून देण्याची विनंती केली. त्यांनी सरपंच माया बोढे व ग्रामपंचायत पदाधिकारी व तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी दोन्ही पक्षाकडील परिवारातील लोकांकडे बोलून लग्नाला संमती मिळवली. आणि हे लग्न शासन नियमाप्रमाणे मास्क व सोशल डिस्टन्स राखून सारिका मोहन धाबेकर तंटामुक्त समिती अध्यक्ष मजरा खुर्द, माया बोढे सरपंच मजरा खुर्द, ग्रामपंचायत सदस्य कैलास तोडासे, माजी उपसरपंच कौतुक मग रे, मंगेश मुरलीधर राजूरकर, गवसा गोबाडे, मंदा महातळे, प्रतिमा मानकर, आशा वर्कर शालू गायधने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रेमविवाह संपन्न झाला.
Maharashtra News Media सच की आवाज