*विद्यार्थी देशाचे भविष्य- मंत्री सुनील केदार
*इयत्ता दहावीच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचां सत्कार करुण पुढील उज्वल भविष्याच्या दिल्या शुभेच्छा*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर*
*सावनेरः क्षेत्राचे लाडके जनप्रतिनीधी, महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांनी सावनेर तालुक्यातील मार्च 2020 च्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊण त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या*

*सावनेर शहर काँग्रेस चे अध्यक्ष पवन जैस्वाल व सचिव विजय बसवार यांच्या संकल्पनेतून सावनेर शहर व तालुक्यातील इयत्ता दहावी च्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळवीलेल्या प्रखविण्याबद्दल त्यांचे कौतुक व्हावे या हेतूने “प्राविण्य प्राप्त”विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मा.सुनील बाबू केदार यांच्या हस्ते शहर काँग्रेस कार्यालय बस स्थान येथे आयोजित केरण्यात आला होता यात प्राविण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना मा.मंत्री साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊण सावनेर शहरासह संपूर्ण तालुक्याचे नाव लौकीक करणारे विद्यार्थी हे संपूर्ण ग्रामीण भागातील व जेमतेम ची परिस्थिती असलेल्या परिवाराची आहेत हे विशेष*

*याप्रसंगी मा.सुनील बाबू केदार यांनी गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत म्हटले की आजचा विद्यार्थी हा देशाचे भविष्य व भवितव्य आहे.विशेषतः ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी हा आपल्या पारिवारिक परिस्थिती, ग्रामीण भागातील कमकुवत असलेल्या शैक्षणिक सोई सुवीधा,दळणवळाची साधने आदींवर मात करत आपल्या स्वप्नपुर्तेकडे वाटचाल करण्याची जिद्दच यांच्या यशाचे गमक आहे असे ठाम विचार व्यक्त करीत सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांशी व्यक्तीशः संवाद साधून त्यांचे उत्साहवर्धन केले*

*याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल, सचिव विजय बसवार,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी,मनोज बसवार,माजी नगरसेवक गोपाल घटे,अश्विन कारोकार,श्रेयेश देशमुख,चंदू कामदार, घनश्याम तुर्के,आदी प्रामुख्याने उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज