*महावितरणचा मनमानी कारभार*

*लाईनमन स्टाँफ उपसणार आंदोलनाचे हत्यार*

*राज्यातील 63 हजाराच्या वर होणार सहभागी*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
नागपुर- *ईलेक्ट्रीसीटी लाईनस्टाफ असोशिएशन ही सघंटना महाराष्ट्रातील तमाम तांत्रीक कर्मचारी यांचे प्रतीनिधीत्व करणारी एकमेव अशी बलाढ्य सघंटना आहे.नेहमी जनमित्राच्या हीताशी कायमच बांधीलकी ठेवुन प्रशासनासोबत संघर्ष करण्यासाठी प्रतीबध्द आहे.
AG ASSET SURVEY चे काम जनमित्राकडुन बळजबरीने करुन घेण्यासाठी प्रशासनाकडुन वारंवार दबावतंत्राचे काम सुरु आहे.या विषयावर सघंटनेच्या केंद्रीय पदाधिकारी यांनी मा.मुख्य कार्यालय,मुबंई,महाराष्ट्र यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे पण यावर कुठलीही ठोस अशी भुमिका प्रशासनाकडुन घेण्यात आली नाही.या अनुषंगाने ई.एल.ए.नी महाराष्ट्रातील तमाम जनमित्राना दिनांक 10/8/2020 ते 12/08/2020 दरम्यान सामुहिक रजा आंदोलनामध्ये कुठलाही सघंटनाभेद मनामध्ये न ठेवता फक्त आणी फक्त एक जनमित्र म्हणुन सहभागी होण्याचे आव्हान करत आहे.कारण आज जर आपण सर्व मिळुन या गोष्टीचा विरोध केला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला खुप मोठी कीमंत मोजावी लागेल.म्हणुन सघंटनेच्या प्रत्येक पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त जनमित्रापर्यंत पोहचुन सघंटनेची भुमिका समजवुन सांगायची आहे.जेणेकरुन या कामगार विरोधी झोपलेल्या प्रशासनाला जागे करता येईल तसेच या निम्मिताने जनमित्राची ताकद व एकजुटता दाखवावी असे आव्हान प्रसिध्दीपत्रकातून करण्यात आले आहे*
*ईलेक्ट्रीसीटी लाईनस्टाफ असोशिएशन, महाराष्ट्र.केंद्रीय उपाध्यक्ष श्री महेशसींग ठाकुर, नागपुर प्रादेशिक सचिव श्री रमेश वाटकर, नागपुर परीमंडळ अध्यक्ष लक्ष्मण वैरागडे, सहसचिव राजेश बावनकुळे, नागपुर ग्रामीण सचिव संदीप वाशिमकर, सावनेर विभाग सचिव रगंलाल रामटेके, सघंटक मनोज चिंचोरीया व सर्व पदाधिकारी तसेच जनमित्र आदिंनी आव्हान केले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज