Breaking News

*गोळीबारात सुरज बहुरिया ह्यांचा मृत्यु* *बल्लारपूर येथिल भरदिवसा थरार*

*गोळीबारात सुरज बहुरिया ह्यांचा मृत्यु*

*बल्लारपूर येथिल भरदिवसा थरार*

विशेष प्रतिनिधि जुबेर शेख
चंद्रपुरबल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या बस स्थानकाजवळील नगर पालिकेच्या गांधी मार्केट जवळ आज दुपारी सुरज बहुरिया ह्यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली असुन जवळून केल्या गेलेल्या गोळीबारात सुरज बहुरिया ह्यांना 3 गोळ्या लागल्या असुन एक गोळी थेट डोक्यात घुसल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज दुपारी सुरज बहुरिया आपल्या मारोती स्विफ्ट कार ने बामणी कडे जात असताना हा गोळीबार करण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन त्यांनी जखमी सुरज बहुरिया ह्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
परंतु चंद्रपूर येथे नेण्यापूर्वीच रस्ताच सुरज बहुरिया ह्यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी बल्लारपूर येथे पोहोचले आहेत. दरम्यान सुरज बहुरिया ह्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्याचे चित्र असुन शहरात संतापाचे तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढे कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणुन पोलिसांनी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले असल्याचे कळले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …