*बोरडा सराख्यात परमात्मा एक सेवकांचे षष्टी हवन कार्य संपन्न..*

*मानव धर्माचा सर्वात मोठा सण साजरा.*
मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी
मनसर– सद्या संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान मांडला आहे,अशा परिस्थितीत कोणतेही कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी सरकारने बंदी घातली आहे. अशातच प्रत्येक व्यक्ती आपापले सण,उत्सव कमीत-कमी लोकात करित आहेत.आज देखील परमात्मा एक सेवकांनी आपापल्या घरीच हवन कार्य करून त्यांनी त्यांचा सर्वात मोठा सण साजरा केला.व्यसनमुक्तीचा संदेश देत समाजाला व्यसनमुक्त करून प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे कार्य बाबा जुमदेवजी यांनी केले होते.व त्यांनी याच महिन्यात पाच हवन कार्य करून भगवंताला प्रसन्न केले होते..त्याचीच आठवण म्हणून हा षष्टी हवनाचा सण साजरा करण्यात येतो.
कोरोना महामारी लक्षात घेऊन आणि कमी लोकात हवन कार्य पूर्ण करून बोरडा सराखा येथील सर्व परमात्मा एक सेवकांनी आपल्या सरकारच्या कार्याला समर्थन असल्याची जाणीव करून दिली आहे.तसेच आज जागतिक आदिवासी दिवस असून हा कार्यक्रम देखील कमी लोकांमध्येच साजरा करू असे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे तडफदार अध्यक्ष कु.अमीर धोटे यांनी सांगितले आहे..
Maharashtra News Media सच की आवाज