Breaking News

*विधान परिषदेसाठी किंवा मंडळावर भटक्या विमुक्तांना संधी द्या* *विदर्भातून राजेंद्र बढिये यांचे नाव आघाडीवर*

*विधान परिषदेसाठी किंवा मंडळावर भटक्या विमुक्तांना संधी द्या*

 

*विदर्भातून राजेंद्र बढिये यांचे नाव आघाडीवर*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपूरराज्यपाल नियुक्त होणाऱ्या विधान परिषद किंवा मंडळावर सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विदर्भातील भटक्या विमुक्त प्रवर्गातील तरुण सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी आता भटक्या विमुक्त प्रवर्गातून पुढे येत आहे. या शर्यतीत विदर्भातील राजेंद्र बढिये आघाडीवर असल्याने सर्व नजरा राष्ट्रवादी नेतृत्वाकडे लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पाऊल पडत आहे. मात्र राज्यातील भटक्या विमुक्तांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय पातळीवर विकास झाला नाही. सातत्याने भटक्या विमुक्त प्रवर्गाला राजकीय पातळीवर डावलण्यात आले आहे. त्यातही फार थोड्या थोड्या प्रमाणात भटक्या जमाती ब प्रवर्गातील समाजावर सातत्याने अन्यायच झाला आहे. आतापर्यंत विधानपरिषदेवर व मंडळावर बहुसंख्येने असलेल्या बंजारा, वंजारी, धनगर या समाजालाच प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र भटक्या जमाती ब प्रवर्गातील कोणत्याही जातीला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे या समाजाच्या प्रश्नांना न्याय देता आला नाही हे सत्य आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष, विदर्भातील भटक्या जमाती ब प्रवर्गातील बेलदार समाजाचे राजेंद्र बढिये हे उमदे व्यक्तीमत्व आहे. गेल्या २५ वर्षापासून सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील भटक्या विमुक्तांचा अभ्यास करून त्यांचे विविध प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, माजी गृहमंत्री आर आर पाटील, आ. प्रकाश गजभिये, आ. खाजा बेग यांच्या माध्यमातून विधानसभेत उचलून धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार भटक्या विमुक्त व इतर जमाती मध्ये विदर्भात वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा कार्यकुशल भटक्या विमुक्त प्रवर्गातील व्यक्तीमत्व राजेंद्र बढिये यांना विधानपरिषदेवर किंवा मंडळावर संधी देण्यात यावी अशी मागणी संघर्ष वाहिनीचे संघटक दिनानाथ वाघमारे, बेलदार समाजातर्फे मुकुंद अडेवार, विनोद आकुलवार, गोसावी समाजातर्फे महेश गिरी, योगेश भारती, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, ढिवर समाजातर्फे भिमराव शिंदेमेश्राम, लोहार समाजातर्फे सदाशिव हिवलेकर, ओतारी समाजातर्फे किशोर सायगन, नाथजोगी समाजातर्फे शंकरराव पुंड, भामटी समाजातर्फे डॉ वासुदेव डहाके, भाट समाजातर्फे विनायक सुर्यवंशी, राजू चव्हाण, प्रेमचंद राठोड, भारवाड समाजातर्फे रामाजी जाेगराना, माजी न्यायमूर्ती चंदालाल मेश्राम, सौ द्वारकाताई एम्बडवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभाग अध्यक्ष रंजना पारशीवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद हिवलेकर, गोपाळ समाजातर्फे अॅड नितीश ग्वालबंशी, गवळी समाजातर्फे डॉ आनंद काकडे, धनगर समाजातर्फे रामेश्वर सोनाग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ उपाध्यक्ष रमेश दादुरे, सचिव खुशाल चवरे यांनी केली आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …