Breaking News

*वर्धेच्या ऑर्गनिक मास्क ला इंग्लंडमध्ये मागणी , आता साहेबाच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क*

*वर्धेच्या ऑर्गनिक मास्क ला इंग्लंडमध्ये मागणी , आता साहेबाच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क*


वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत.

प्रतिनिधी:-पंकज रोकडे

वर्धा : स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वाचे शस्त्र ठरलेल्या महात्मा गांधी यांच्या खादीचे आज महत्व वाढले आहे. खादी कापड वस्त्र म्हणून तर साता समुद्रापलीकडे पोहचले होते. पण आता हीच खादी मास्कच्या रुपात इंगलडमध्ये पोहचली. कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडणारी खादी इंग्लंडमध्ये पसंतीला उतरली आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे.
मार्च महिन्यात भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि लगेच वाढलेली धावपळ सर्वांनाच भयभीत करणारी होती. लॉकडाऊन लागताच मास्कचे महत्त्वही वाढले. पण निर्यातीवर बंदी असल्याने मास्क बाहेर देशात जात नव्हते. बंदी उठली आणि वर्धा जिल्ह्यात तयार होणारे खादी मास्क भारतासह इंग्लडमध्येदेखील पोहचले.
आता गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल आणखी पुढे जात, अस्सल सेंद्रिय कपाशीच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना हे मास्क पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला पडले.
ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीचे तयार केलेले मास्क इंग्लंडच्या बाजारात जाऊ लागले आहेत. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या सेंद्रिय मास्कने विदेशातही खादीचे गुणगाण गायले आहेत. ९३३४ मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली होती. इथं कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. त्याकरिता तेथूनच त्याचं डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईची पद्धतही सांगितली.
जवळपास एक महिना त्यावर बारीक काम केल्यावर मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन ऑर्डर मिळतील, असा विश्वास ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …