*आदिवासी संस्कृती जपत,आदिवासी महापुरुषांना मानवंदना देत उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग द्वारा बिरसा मुंडा सभागृह,सुभाषनगर नागपूर येथे गोंडी सप्तरंगी ध्वजारोहण नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य दिनेश शेराम यांचे हस्ते करून,पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी पार पाडण्यात आले.आदिवासी समाजात पवित्र मानण्यात येणाऱ्या व कल्पवृक्ष समान दर्जा असलेल्या “मोह” व “पिंपळ” वृक्षाचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संरक्षणाची प्रतिज्ञा करण्यात आली,या प्रसंगी बोलताना दिनेश शेराम म्हणाले की,आदिवासी संस्कृती ही महान संस्कृती असून तिचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे,लुप्त होत असलेली आपली गोंडी बोलीभाषा जपली पाहिजे,आदिवासी समाजातील राजे,महाराज,पराक्रमी महाराणी,क्रांतिकारक,सामाजिक नेते यांचा इतिहास नवीन पिढीला कळावा यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यास क्रमात त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली,यानंतर नागपूर नगरीचे निर्माते गोंड राजे बक्त बुलंद शाह यांच्या सिव्हील लाईन,नागपूर स्थित पुतळा,वीरांगना राणी दुर्गावती पुतळा,राणी दुर्गावती नगर, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,संविधान चौक,क्रांतिवीर नारायण सिंह ऊइके पुतळा, बर्डी,आदिवासी समाज क्रांती चे जनक बिरसा मुंडा पुतळा, फुटाला यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,गोंडी राज ध्वज फडकवून मानवंदना देऊन उत्साहात जागतिक दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्वश्री दिनेश शेराम,विजय परतेकी,सुरेंद्र नैताम, शाम कुमरे,स्वप्नील मसराम,यशवंत मसराम,रोशन यादव,घनश्याम मसराम,राहुल मडावी,आकाश परतेकी, निकेश परतेकी,प्रशांत सयाम,सागर सयाम,प्रमोद उईके,जितेंद्र आत्राम,संदीप आत्राम,मनोज कुसराम,सुखराम भंडारे,श्रीराम नैताम,सीमा कुंजाम,अनिता परतेकी,कविता मसराम, अशोक सयाम,सचिन उईके,प्रांजली नैताम,सोनू परतेकी,राहुल मडावी, भरत उइके, गजानन नैताम,हर्षला कुमरे, दिव्या नैताम,नितेश मसराम,मनोज कुरमते आदींनी परिश्रम घेतले.

Maharashtra News Media सच की आवाज