*गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड – तालुक्यातील केवराम पिपला, मोहगाव(भदाडे ), मालापूर, सावरगाव या गावात मा. ना. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री, (महाराष्ट्र राज्य ), यांनी भेट देऊन शेतकऱ्यांसोबत, कोरोनाबाबतीत, पीक कर्ज, सद्यपीक परिस्थिती बाबत चर्चा केली,विविध योजनाचे भूमिपूजन, उदघाट्न, तसेच 10 वी व 12 वी मधील सावरगाव सर्कल मधिल प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला.

यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, सौं. देवकाताई बोडखे सदस्य जी. प. सौं. अरुणा मोवाडे, श्री. महिंद्रा गजबे सदस्य पंचायत समिती, श्री. दीपक मोहिते, श्री. सतीश शिंदे, श्री. वसंत चांडक, श्री. नरेश अरसडे, माजी सभापती, श्री. उंबरकर,उपविभागीय अधिकारी, श्री. गाढे तहसीलदार, श्री.प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी,, श्री. विद्यानंद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, श्री जुमडे तालुका कृषी अधिकारी, सर्व सरपंच, सचिव, आरोग्य कर्मचारी, सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*

Maharashtra News Media सच की आवाज