Breaking News

*बहुगुणी रानभाज्यांचे महत्व सर्वत्रचं परंतु उचित बाजारपेठ मिळावी. – अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले**जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न*

*बहुगुणी रानभाज्यांचे महत्व सर्वत्रचं परंतु उचित बाजारपेठ मिळावी. – अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले*

*जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न*

 कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे
चंद्रपुर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. आणि रानभाज्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यातून आदिवासी शेतकर्‍यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे अशा बहुउद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेहस्ते आज पार पडले.


चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचयाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पट्ट्यानुसार अनेक रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात, रानभाज्या ह्या गुणधर्मयुक्त असतात यासोबतच आहारामध्ये त्यांचे सेवन उपयुक्त ठरते. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी, त्यांचे आहारातील महत्व लोकांना पटावे. आणि ग्रामीण भागासह शहरातील मंडळींना ही या रानभाज्यांचे बहुगुण कळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर असे महोत्सव होणे आवश्यक आहे. आज अनेक तालुक्यांत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येवून तेथील स्थानिक रानभाज्या व रानमेव्याचे दर्शन आपल्याला या माध्यमातुन येत आहे. नवनवीन रानभाज्यांचे नावे, त्यांचे बहुगुण आपल्याला अशा माध्यमातुन कळतात. त्यामुळे आपल्या अन्नासाठी आणि निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक भूमिका बजावणाऱ्या रानभाज्यांना उचित बाजारपेठ मिळावी. त्यांचे महत्व अधोरेखित व्हावे. आणि त्यातून अशा रानभाज्यांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी अशा कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात यावे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी याप्रसंगी बोलतांना केले.
तसेच, यावेळी लावलेल्या रानभाज्या प्रदर्शनीला भेट देऊन त्यांनी कडू भाजी, काटवल, गुलवेल, कुळ्याचे शेंगा, धानभाजी, भूईनिंब, तट्टूचे फुल, शेंगा, शतावरी, पातुरभाजी, तरोटा इ. यांसारख्या अनेक परिचित- अपरिचित रानभाज्यांची पाहणी केली.
यावेळी त्यांसमवेत, खासदार बाळूभाऊ धानोरकर, महापौर सौ. राखी कंचर्लावार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती वरखेडकर, प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, यांसह आदि मंडळी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …