*शासकीय कार्यालयात प्रसाधनगृहाची व्यवस्था करा*

*राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची मागणी*
वरोरा प्रतिनिधी- जुबेर शेख
वरोरा – स्वच्छ भारत समु्ध्द भारत हे बीद वाक्य तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतेचे पुजारी महामानव श्री. संत गाडगेबाबा या महापुरुषाची प्रेरणा घेऊन आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांनी स्वच्छतेचा विडा उचलत “स्वच्छ भारत,समु्ध्द भारत या योजनेअंतर्गत प्रत्येक गावखेडे, शहर, शाळा व शासकीय कार्यालय मध्ये महिला पुरुषांकरिता स्वच्छता गृह उपलब्ध असले पाहिजे असा माणस मा. पंतप्रधान साहेबाचा आहे परंतु उपविभागीय कार्यालय, वरोरा याला अपवाद आहे येथे महिला करिता प्रसाधनगृह व स्वच्छता गृह तर सोडा पण पुरुषाकरिता स्वच्छतागृहाची उणीव भासते दैनंदिन कामकाजा करिता शेकडो महिलाना गाव खेड्यापासून ते शहरापर्यत येथे कार्यालयीन कामकाजाकरिता तास न तास थांबून राहावे लागते अशा वेळेस महिलांकरिता प्रसाधनगृह नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो याच प्रश्नाची जान ठेवून त्वरित समस्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका वरोरा च्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी, वरोरा यांना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्री. मोरेश्वररावजी टेमुर्डे साहेब व महिला तालुका अध्यक्ष व सरपंच ग्रामपंचायत चिनोरा सौ. सुशीलाताई तेलमोरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले*
*यावेळी तालुका अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत दहेगाव श्री.विशालभाऊ पारखी युवा नेते श्री. जयंतभाऊ टेमुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. अविनाशजी ढेंगळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजयजी भोंगाडे, वरोरा पंचायत समिती सदस्य सौ. पार्वताताई ढोक, सौ. विठाबाई झाडे सरपंच ग्रामपंचायत येन्सा, सौ. ज्योतीताई पेटकर सरपंच ग्रामपंचायत भेंडाळा, सौ. मनीषाताई कांबळे सरपंच ग्रामपंचायत भटाळा, सौ. मायाताई बोढे सरपंच ग्रामपंचायत सालोरी, सौ. मनीषाताई सावसाकडे व असंख्य महिला तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका वरोरा चे कार्यकर्ते उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज