Breaking News

*आयएमए,नीमा व सावनेर होमिओपॅथी असोशियेशन चे 100 च्या वर डॉक्टर करणार कोरोना विषाणूं बाबत जनजागृती* *उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय, नगर प्रशासन,पोलीस प्रशासनाचा सहभाग*

*आयएमए,नीमा व सावनेर होमिओपॅथी असोशियेशन चे 100 च्या वर डॉक्टर करणार कोरोना विषाणूं बाबत जनजागृती*

*उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय, नगर प्रशासन,पोलीस प्रशासनाचा सहभाग*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया*

*सावनेरः दिवसेंदिवस वाढत असलेला कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव व त्यातून वाढणारा मु्तकांचा आकडा़ कीतीही केल्या कमी होत नाही.शासकीय स्तरावरील सर्व उपाययोजना,जनजागृती, सक्तीचे लाँकडाऊन करुण सुध्दा नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मीळत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात हा संसर्गजन्य आजार मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत अश्यातच केन्द्र व राज्य शासनासोबतच स्थानिक प्रशासन ही चींतातुर होत आहे .अश्यात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नँशनल इंन्स्ट्रीगेस्ट मेडिकल असोसिएशन व सावनेर होमिओपॅथी असोशियेशन आदिंच्या संयुक्त सहभागातून संपूर्ण सावनेर शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूंच्या वाढता प्रादुर्भाव तसेच कोवीड 19 विषाणूंचा शोध लावणार्या अँन्टीजेन व आरटीपीसीआर या टेस्टींग बद्दल नागरिकांत असलेला गैरसमज तसेच सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या बर्याचश्या अफवा यावर जनजागृती करण्याच्या हेतूने दि.13 आँगस्ट पासुन होळी चौक येथून जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला*

*सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, पोलीस निरिक्षक अशोक कोळी,आयएमए चे डॉ. प्रविण वाकोडे,निमा संघटनेचे डॉ. राहुल दाते,सावनेर होमिओपॅथी असोशियेशन चे पदाधिकारी आदिंच्या प्रमुख उपस्थितीत होळी चौक येथून या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी नागरिकांना कोरोना विषाणूंच्या तसेच टेस्टींग च्या संबंधित कोणत्याही प्रकारचे गैरसमझ न बाळगता आपल्या क्षेत्रातील नजिकच्या कोवीड़ सेंटर वर जाऊण आपली तपासणी करुण घेण्याची तसेच आपल्याला अथवा परिवारातील कुणाही सदस्यांला असलेल्या आजारासंबधीची माहीती लपवून आपल्या परिवायावर कटू प्रसंग ओढावून घेऊ नका असे निवेदन केले.तर मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी नागरिकांना आव्हान केले की स्थानिक प्रशासन नगरीतील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सतत प्रयत्नशील आहे आपन पुढाकार घ्यावा व सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या कोणत्याही भ्रामक अफावांवर लक्ष न देता नगर प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली.तर पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी अफवा पसरविणार्यांपासुन सावध राहून कोवीड़19 विषयी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटोकोर पलान करुण सहकार्य करा अन्यथा स्थानिक प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनास सक्तीचे पाऊल उचलण्यास बाध्य व्हावे लागेल असे मत व्यक्त केले*

*तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ प्रविण वाकोडे यांनी आपल्या जनजागृती संबोधनातून म्हटले के कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुख्य उपचार म्हणजे स्वताःची व परिवाराची सुरक्षा आपल्या परिवारात कुणालाही सर्दी, पडसे,खोकला,ताप सारखी लक्षणे आढळताच अविलंब डाँक्टरांचा उपचार घ्या शासनाने आपल्या मोफत तपासणीची व्यवस्था केली आहे त्याचा लाभ अवश्य घ्या अशी विनंती करत म्हटले की एकदा हा विकार वाढला तर तज्ञ डाँक्टर सुध्दा काही करु शकणार नाही आणी हा उपक्रम आपल्माच करिता आहे असे मत व्यक्त केले तर नीमाचे डॉ राहुल दाते यांनी या जनजागृती अभियानास मार्गदर्शन करत म्हटले की सर्व प्रथम तर नागरिकांनी अँन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट संदर्भातील गैरसमज दुर सारुन सोबतच वाँटसप, फेसबुक वरुण मिळत असलेल्या भ्रामक अफावांवर लक्ष न देता कोरोना विषाणूंच्या नव्हे तर सर्दी,खोकला,ताप असे लक्षणे दिसताच सर्वप्रथम आपण आपली कोवीड़19 तपासणी करुण घ्या कारण कोरोना विषाणूची लागन झाल्यापासून कीमान सात ते चौदा दिवसापर्यंत रुग्ण सामान्य दिसतो परंतु तोवर खुप उशीर होतो याच कारणामुळे कोरोना बाधित रुग्णाच्या दगावण्माच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.शासन, स्थानिक प्रशासन सोबतच सावनेर शहरासह संपूर्ण तालुक्यातील डाँक्टर आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.करिता कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपण सहकार्य करा आपण सर्व मिळून या कोरोना विषाणूंला हद्दपार करुण त्यावर विजय मीळवू असे मत व्यक्त केले*

*याप्रसंगी डॉ. अमित बाहेती,डॉ. पराग झोपे,नगर प्रशासन सावनेर चे दिनेश बुधे,पंकज छेनीया, मधुकर लोही,धिरज देशमुख, अमोल कांबडे,राजेश जांभुळकर,विनायक पोटोडे,निरज काळे,नितीन चाचरकर, सुजीत आढे,अनिल भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*

*आयोजनाचे प्रास्ताविक डॉ. राहुल दाते यांनी तर सतत धार पाऊस सुरु असतांना संपूर्ण स्थानिक प्रशासन, पत्रकार बांधव तसेच सर्व खाजगी डाँक्टरांच्या सर्व संघटनांनी या राष्ट्रीय आपदेच्या वेळी एकत्र येऊण घरो दारी जाऊन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व डाँक्टरांचे आभार तहसीलदार दिपक कारंडे यांनी मानले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …