Breaking News

*न.प.अभ्यंंकर प्राथमिक शाळेत बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन*

*न.प.अभ्यंंकर प्राथमिक शाळेत बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन*

*वरोरा प्रतिनिधी दीनेश चौरसीया*

सावनेरः पं.स.सावनेर तर्फे *गंदगी मुक्त गाव* या विषयावर १ तर ५ करीता चित्रकला स्पर्धा आणि ६ ते ८ करीता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात उत्कृष्ट चित्र काढणा-या विद्यार्थ्यांना आज शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता गणेश झाडे व उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.नरेन्द्र चापरे,सुरेश गजभे, माणिक रामटेके, गजानन पटले, सुनंदा राऊत, ज्योती कोडापे, नर्मदा डवरे,अंजली पगारे आणि अनुसया बाई नारेकर उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढणा-यात इ.५वी चे त्यागी ढवळे, युक्ती कामोने, अंजली पटेल,तेजस्वी बांगडे,प्रियंका बिलवार,भव्यता लाड,नमन वासनिक,फैज शेख,समीर गाढवे इ.४ थी ची नंदीनी भिंगारे इ.३ री साक्षी खोंडे,वंशीका मारबते,भावेश वाढबुधे यांनी सहभाग घेतला.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई घटे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटप केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …