*15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर मोवाड नगरीत तरुणांकडून वृक्षरोपन*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
*एक पौधा एक संकल्प*
झाड लावु आपण सारे फळदेई सर्व परे
मिळे शुद्ध हवा
र्दीघ आयुष्यी होऊ सारे
मोवाड़ –यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉ..सुभाषजी पुरी माजी कुलगुरू, मा.नितिन.तापकीर न.प.प्रशासकीय अधिकारी तथा माजी सैनिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्य वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण पुरक व र्दीघ आयु असणारे भारतीय देशी झाड म्हणून व आयुर्वेदात ज्या झाडाचे महत्त्व हे मानवी जिवनाला पण र्दीघ आयुष्य देणारे झाडाचे जतन करणे ही आज काळाची गरज आहेत.अशा झाडाचे रोपन करण्यात आले.
त्यात 16 कडुलिंब,4 वड, 3 पळस,3 चिंच, 2 पिंपळ, 2 आपट्याची रोपटे लावण्यात आली .तसेच यावेळी माजी मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या निर्मात संपूर्ण कोरोना फायटर टीम उपस्थित होती. यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन मोवाड येथे साजरा करण्यात आला.आणि विशेष म्हणजे
दोन – दोन व्यक्ती मिळून एक – एक झाडांचे पालकतत्व घेण्यात आले. व सर्वांनी वडीलधारी मंडळीच्या मार्गदर्शनाने वृक्ष लागवड व संवर्धनाचा तसेच संपूर्ण जुने मोवाड हिरवेगार करण्याचा संकल्प घेतला हे 30 रोपटे हिन्दू स्मशान भूमी आणि मुस्लिम कब्रस्तान येथे लागवड करण्यात आली. हा वूक्ष लागवड कार्यक्रम कोरोना फायटर टिमने आयोजित केलात व यशस्वी रिते पार पाटणेसाठी अथक परीश्रम घेतले
Maharashtra News Media सच की आवाज