Breaking News

*राज्यशास्ञ कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रची कार्यकारणी जाहिर.*

*राज्यशास्ञ कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रची कार्यकारणी जाहिर.*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- राज्यशास्ञ कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची स्थापना झाली असून, राज्य अध्यक्षपदी प्रा. सुमित पवार यांची तर राज्य सचिव पदी प्रा.डाॅ. पितांबर उरकूडे यांची निवड झालेली आहे. तसेच नागपूर विभागिय कार्यकारिणी सुध्दा स्थापन झाली आहे. विभागिय अध्यक्षपदी प्रा. डाॅ. सुधीर अग्रवाल यांची तर विभागिय सचिव म्हणून प्रा. रवीकांत जोशी, प्रा. पदमाकर सावलकर यांची निवड झालेली आहे.
अद्ययावत राजकीय घडामोडी विषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देणे, राज्यशास्त्र विषयामध्ये विद्यार्थ्यांची रूची वाढवणे तसेच विविध उपक्रम व प्रकल्पाच्या आधारे प्रभावी अध्यापन करणे, या उद्देशाने कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र परिषदेची स्थापना झाली आहे. राज्यशास्त्र विषयाचा कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर असलेला अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता ई. बाबिंवर विचारमंथन करण्यासाठी वेळोवेळी परिषदेची सम्मेलने घेतली जाईल. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित समकालीन प्रशनांची, समस्याची चर्चा घडवून आणणे. दरवर्षी परीक्षेचे अधिवेशन भरविणे. राज्यशास्त्र विषयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची गुणगौरव करणे, राज्यशास्त्र विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणे, निश्चित अभ्यासक्रमावर चर्चासत्र आयोजित करणे, अध्यापन पद्धतीत नवनवीन शैक्षणिक तंत्राचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि अशा विविध उद्दिष्टांना समोर ठेवून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची स्थापना करण्यात आली विभागीय स्तरावर कार्यकारिणी तयार करून त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारणी च्या माध्यमातून परीक्षेची सर्व राज्यशास्त्र शिक्षकांना जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे त्याकरिता ऑनलाईन सदस्य नोंदणी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेमार्फत सुरू करण्यास आली आहे कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करीत असलेल्या सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींना आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी या राज्यशास्त्र परिषदेचे सदस्य व्हावे तसेच सर्व कार्यकारणी पदाधि-यांचे हार्दिक अभिनंदन असे महाराष्ट्र राज्यअध्यक्षांनी म्हटले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …