*महावितरणचा मनमानी कारभाराच्या विरोधात लाईनमन स्टाँफने उपसले आंदोलनाचे हत्यार*
*तिन दिवसीय राज्यव्यापी आंदोलनात राज्यातील 63 हजाराच्या वर सहभागी*
मुख्य संपादक किशोर ढूँढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर
सावनेर – ईलेक्ट्रीसीटी लाईनस्टाफ असोशिएशन ही सघंटना महाराष्ट्रातील तमाम तांत्रीक कर्मचारी यांचे प्रतीनिधीत्व करणारी एकमेव अशी बलाढ्य सघंटना आहे.नेहमी जनमित्राच्या हीताशी कायमच बांधीलकी ठेवुन प्रशासनासोबत संघर्ष करण्यासाठी प्रतीबध्द आहे.AG ASSET SURVEY चे काम जनमित्राकडुन बळजबरीने करुन घेण्यासाठी प्रशासनाकडुन वारंवार दबावतंत्राचे काम सुरु आहे.या विषयावर सघंटनेच्या केंद्रीय पदाधिकारी यांनी मा.मुख्य कार्यालय,मुबंई,महाराष्ट्र यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे पण यावर कुठलीही ठोस अशी भुमिका प्रशासनाकडुन घेण्यात आली नाही.या अनुषंगाने ई.एल.ए.नी महाराष्ट्रातील तमाम जनमित्राना दिनांक 10/8/2020 ते 12/08/2020 दरम्यान सामुहिक रजा आंदोलन उभारुन महाराष्ट्र शासन व महावितरण चे लक्ष वेघले.कुठलाही सघंटनाभेद मनामध्ये न ठेवता फक्त आणी फक्त एक जनमित्र म्हणुन सहभागी होत महावितरणच्या दडपशाही धोरणाचा विरोध नोंदवत.कामगार विरोधी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे तसेच या निम्मिताने जनमित्राची ताकद व एकजुटता दाखवीत सध्याच्या स्थितीत असलेले सांकेतिक आंदोलनाचे रुपांतर भविष्यात मोठे स्वरुप धारण केल्यास उदभनार्या परिस्थीतीची जबाबदारी महावितरण ची राहील असा आवाज ही याप्रसंगी बुलंद करण्यात आला*
*ईलेक्ट्रीसीटी लाईनस्टाफ असोशिएशन, महाराष्ट्र.केंद्रीय उपाध्यक्ष श्री महेशसींग ठाकुर, नागपुर प्रादेशिक सचिव श्री रमेश वाटकर, नागपुर परीमंडळ अध्यक्ष लक्ष्मण वैरागडे, सहसचिव राजेश बावनकुळे, नागपुर ग्रामीण सचिव संदीप वाशिमकर, व सर्व पदाधिकारी तसेच जनमित्र आदिंनी आव्हान केले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज