Breaking News

*74 वा स्वातंत्र्य दिन साजरा..* *बोरडा सराखा येथील ग्रामस्थांनी केले नियमांचे पालन..*

*74 वा स्वातंत्र्य दिन साजरा..*

*बोरडा सराखा येथील ग्रामस्थांनी केले नियमांचे पालन..*

मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी

मनसरसद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक सण,उत्सव कमी लोकात साजरी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.देशातच नव्हे तर संपुर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे.मोठ्यातील मोठे सण देखील साजरे करण्यास बंदी घालण्यात आले आहे.आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि गौरवाचा असतो.सर्व सरकारी कार्यालयात आजच्या दिवशी आपल्या देशाचा तिरंगा ध्वज आकाशात फडकावून देशाला गुलामगिरीतून बाहेर काढून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान हुतात्म्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली वाहतात.आजदेखील देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य बोरडा सराखा या गावात,ग्रामपंचायत कार्यालयात तसेच जि.प.प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.गावातील प्रत्येक व्यक्तीने कोरोना या संसर्गजन्य रोगाला दूर ठेवण्यात ग्रामपंचायत कार्यालयाला सहकार्य करावे असे सरपंच जगदिश अडमाची यांनी सांगितले.तसेच आरोग्य सेवक टोंगसे साहेब यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखूमुक्त भारत व्हावे यासाठी प्रतिज्ञा घेतली.हा संपूर्ण कार्यक्रम कमी लोकांत आणि सोशल डिस्टन्स व मास्क घालून पार पाडण्यात आला.याकरिता गावातील मोजके सर्व नागरिक, तरुण मंडळी यांनी सहकार्य केले..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …