*मोवाड शहरात कोरोना काळात घरीतोंरण बांधून पोळ्या साजरा*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
शिंगे घासली
बांशिगे लावली
मांढूळी बांधली
मोरकी अवळली
तोड चढविले
कसरा ओला
घुगरू माळा
वाजे खळाखळा
आज आहे सण बैल पोळा
एक नमन गौवरा पारबती हर भरा हर हर महादेव
मोवाड– भारतीय संस्कृती मध्ये हिंदूधर्मातील पोळ्या हा सण ज्या शेतकऱ्याचा घरी बैलाची जोडी असते मग तो हिंदु असो की मुस्लिम कींवा शिख हे सर्वधर्मीय लोक मोठ्या उत्साहात पोळ्या सण साजरा करतो संपूर्ण भारतात प्रत्येक राज्या मध्ये वेगवेगळ्या नावने पोळा साजरा केला जातो.पोळा म्हणजे वर्षभर शेतात राबराब राबुन शेतकऱ्यांना च्या बरोबर कष्ट करणारा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरीबंधू दरवर्षी श्रावणमहिनात अमावस्येच्या तिथीला पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरी नवचैतन्यच संचारले असते.यावर्षी कोरोना महामारीमुळे उद्भभवलेली परिस्थिती लक्षात घेता या संसर्गाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी पोळा व तान्ह्या पोळा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा नकरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत.यामुळेच मोवाड येथील शेतकरी शांताराम कोरडे व त्याच्या कुंटुबाने व मोवाड शहरातील इतर शेतकऱ्यांनी सुध्दा कोरोना काळातील पोळ्या हा आपल्या घरी तोरण बंधून साजरा केलात.त्यामुळे मोवाड शहराची ३०० वर्षाची पोळा उत्सवाची पंरपरा यंदा खंडीत झाली.

पोळाच्या दिवस हा बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतन) देण्यात येते.पोळ्या सणानिमित्त बैलांच्या खांद्यावर हळद व तुप किंवा तेलाने शेकले जाते.याला “खांद शेकणे “असेही म्हणतात .तर पोळ्याच्या दिवशी बैलाला छान गावात जवळच्या नदिवर नेऊन पोहालावणे त्याची साबण लाऊन आंघोळ करणे किवा घरीच करणे त्यांनंतर त्यांच्या पाठीवर झुल चढवली जाते.सर्वागावर गेरूचे ठिपके ,शिंगाना बेगड,डोक्याला बांशिग,गळ्यात कवडया व घुंगरांच्या माळा,नवी वेसण,नवा कसारा आणि पायात चांदीचे वा करदोडयाचे तोडे घातले जातात.महत्त्वाचे म्हणजे बैलांची निगा राखणारे बैलकरी घरगडयास नवीन कपडे दिले जातात.
Maharashtra News Media सच की आवाज