*नको देवराया अंत असा पाहुँ*
*भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याला घाण कचर्याच्या वेढा व मनोरुग्णांचा वावर*
*शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्याचे संगोपन करण्यात नगर प्रशासन अक्षम ठरत आहे*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः शहरातील मुख्य चौकापैकी एक असलेल्या गडकरी चौकात मराठी भाषेची अस्मिता व गोडी आपल्या साहित्य लेखन व नाटकाव्दारे सात समुद्र पार पोहचविणारे थोर नाटककार, भाषाप्रभू व शेक्सपिअर उपाधीने अलंकारित कै.राम गणेश गडकरी यांचा अर्धकु्ती पुतळा असुन सदर पुतळ्याला लागतच नगर प्रशासनाने कचराकुंडी ठेवल्या आहेत सदर कचराकुंडीत बाजारातील दुकानातून निघनारा कचरा संकलित केला जातो.व नंतर नगर प्रशासनाच्या कचरा संकलन करणाऱ्या वहानांनी तो डंपिंग यार्ड मधे रवाना करण्यात येतो*

*परंतू कै.राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या घाण कचर्याचा ढीगारा व तेथून उठणाऱ्या दुर्गंधी व त्या कचर्यावर ताव मिळणार्या मोकाट जनावरांना बघून कसे वाटत नाही की सदर घाण कचर्याची दररोज उचल होत असेल.*

*नगरितील अनेक पुतळ्याच्या परिसरातील अवस्था अश्याच प्रकारची आढळून आली तर आश्चर्य नको अश्या अवस्थेत ही स्वच्छ व सुंदर शहर म्हणून आपली पाठ थोपवून आपल्या नाकार्तैपणा लपविण्याचा केवलवाना प्रकार होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी बघावयास मीळत आहे*
*नगरिच्या मधोमध मुख्य मार्गावर जर असा प्रकार जनप्रतिनीधींच्या नजरेत पडत नाही तर नगरीच्या आत तर धन्य रे बावा*

*थोर महापुरुषांच्या पुतळ्याच्या अश्या प्रकारच्या संगोपनामुळे नगर प्रशासनाच्या स्वच्छ भारत समु्ध्द भारत योजनेचा बोजेवारा उघड्यावर येत असुन थोर नाटककार कै.राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्या मागे साचलेल्या घाणीमुळे व पुतळा परिसरात मतीमंद,मनोरुग्ण, वेड्यांचा वावर तसेच पुतळ्याच्या आजुबाजुला लागणार्या दुकानामुळे सदर पुतळ्याची विदु्पता वाढुन सौंदर्य प्रभावीत होत असल्याने गडकरी प्रेमींमधे संतापाची लाट आहे*
*कै.राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्या मागील घाण तात्काळ उचलून भविष्यात तेथे घाण कचरा टाकल्या जाणार नाही अशी उपाययोजना तसेच गडकरी पुतळा परिसरात मनोरुग्णांचा वावर व पुतळा लागत असलेली दुकाने इतरत्र हलवीण्याची मागणी गडकरी प्रेमीतून होत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज