Breaking News

*कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यावर्षी गणेश उत्सव साजरा करून सहकार्य करा*-पोलीस अधिक्षक राकेश ओला *नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी असे आव्हान* *गणेशोत्सव,गौरी सणा निमित्त सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या दिशानिर्देशाचे पालन करावे*

*कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यावर्षी गणेश उत्सव साजरा करून सहकार्य करा*-पोलीस अधिक्षक राकेश ओला


*नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी असे आव्हान*

*गणेशोत्सव,गौरी सणा निमित्त सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या दिशानिर्देशाचे पालन करावे*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेरयावर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेश उत्सव गणेशाची प्रतिष्ठापना करून साजरा करू नये. तर सर्व गणेश मंडळांनी या वर्षीचा गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी केले.*

*पंचायत समिती सावनेर कार्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक गणेश उत्सव 2020 च्या आयोजित आढावा बैठकीत पोलीस अधिक्षक राकेश ओला बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार दिपक कारंडे,पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, विस्तार अधिकारी अनिल नागने,पत्रकार बांधव व गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित संपन्न झालेल्या या सभेला संबोधित करत .*

*नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या अनुषंगाने या वर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिकरीत्या गणपती न बसवता घरच्या घरीच पर्यावरणपुरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी. तसेच विसर्जनही घरच्या घरीच करावे. गणेशाच्या मूर्ती या धातू अथवा संगमरवरी नसाव्यात त्या शाडूच्या अथवा पाण्यात सहजपणे विरघळून जाणार्याय असाव्यात. यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा तसेच जिल्ह्यातील नागरिकांनीही आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करताना लहान व विसर्जनाच्यावेळी पाण्यात सहज विरघळणारी मूर्ती बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.*

 

*जिल्ह्यातील कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगून यावर्षीचा गणेशोत्सव हा सामाजिक उपक्रमाने जसे की रक्तदान, झाडे लावणे डॉक्टर व नर्सेस यांना पीपीई किटचे वाटप, कोवीड़ 19 विषाणूंवर प्रभावी गोळ्यांचे वाटप, विटामिन्स सी व डी गोळ्यांचे वाटप, त्याप्रमाणेच covid-19 च्या अनुषंगाने रूग्णालयाला तसेच गोरगरीब गरजू रुग्णांना मदत करणे या पद्धतीने साजरा करावा आवाहन त्यांनी केले.*

*तर कोविड-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले एक जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडावे व गणेशोत्सव व गौरी पूजनाच्या अनुषंगाने गर्दी न करता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी करत नागरिकांना विनंती केली की सर्व महिलांनी गौरी पूजन सणामध्ये गाठीभेटी घेऊ नये. तसेच खरेदीसाठी बाहेर पडू नये व गर्दी करू नये असेही त्यांनी सुचित केले.*

*तर तहसीलदार दिपक कारंडे यांनी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात एकाच ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करण्याचे स्टॉल न लावता प्रत्येक वार्डात मूर्ती विक्रीचे स्टॉल उभा करावेत व याठिकाणी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन होईल याबाबत नागरिकांनी स्टॉल विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी. जिल्हा व पोलिस प्रशासन आपले काम करणार आहेत. परंतु प्रत्येक नागरिकांनी कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वे पालन करावे व ज्याप्रमाणे पोळा उत्सव आपल्या घरोघरी साजरा करुण मोलाचे सहकार्य केले तसेच सहकार्य या गणेश उत्सवात देखील करावे अशी विनंती केली*

 

*तर यावेळी पोलीस पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी ही आपल्या प्रास्ताविकात म्हटले की अद्याप एकही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने होऊ घातलेल्या गणेशोत्सव करीता परवानगी अर्ज केला नसला तरीही गणेशोत्सव व गौरी सणानिमित्त पोलीस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.तसेच सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या अनुषंगाने राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळ यांच्या प्रतिनिधींना दिली तसेच दिनांक 22 ऑगस्ट 2020 रोजी गणेशाची प्रतिष्ठापना व दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी गणेशाचे विसर्जन या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांची कामे याबाबतची माहिती त्यांनी दिली.*

*याप्रसंगी उपस्थित गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची मा.पोलीस अधिक्षक, मा.उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदींनी समाधान कारक उत्तरे देऊण त्यांचे समाधान केले तर याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊण स्वागत करण्यात आले हे विशेष*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …