Breaking News

*राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले* *आझमगड सीमेवर ची घटना*

*राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले*0

*आझमगड सीमेवर ची घटना*

प्रतिनिधि- पवन कीरपाने

नागपुर– काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काँग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.

काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …