Breaking News

*जिल्ह्यात आज ६०५ पॉझिटीव्ह; तर ५०८ रूग्णांनी केली कोरोनावर मात*

*जिल्ह्यात आज ६०५ पॉझिटीव्ह; तर ५०८ रूग्णांनी केली कोरोनावर मात*

जळगाव प्रतिनिधी- प्रतीक सेठ

जळगाव- जिल्ह्यात आज ६०५ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून आजच ५०८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आजच्या रूग्णसंख्येमुळे आजवरच्या बाधीतांची आकडेवारी २२ हजारांच्या पार गेली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने काल सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १०१ रूग्ण हे एरंडोल तालुक्यात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव व अमळनेर तालुक्यात अनुक्रमे ९७ आणि ८१ रूग्ण आढळून आलेत.

तालुकानिहाय आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१०१; जळगाव ग्रामीण-१३; भुसावळ-८; अमळनेर-९७; चोपडा-४६; पाचोरा-३६; भडगाव-४७; धरणगाव-५; यावल-२८; एरंडोल-१०१; जामनेर-३३; रावेर-६०; पारोळा-७; चाळीसगाव-२९; मुक्ताईनगर-१; बोदवड-१० व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २२३१८ इतकी झालेली आहे. यातील १५४५३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५०८ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७२९ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६१३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …