*पत्रकार कैलास बनकर यांचे आकस्मिक अपघाती निधन*

*आक्रमक लेखनी, सुपरिचित कवी,प्रसिद्ध चित्रकार असे त्रिमूर्ती व्यक्तिमत्वाचा कालावश*

*विशेष प्रतिनिधी मौदा*
*मौदाः संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुपरित्रचित असलेले कवी ,चित्रकार व पत्रकार कैलास बनकर (वय- ४२) यांचे आज सायंकाळी ४ वाजता च्या वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील माथनी टोल नाक्याजवल अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.*
*मौदा येथे त्यांचे प्रिंटिंग चे दुकान होते. काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 40 बी पी 7648 ने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले.*
*मौदा पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नागपूर मेयो ला रवाना केले*
*आकस्मिक मु्त्यू पावलेल्या कैलास बनकर यांचे मूळ गाव तारसा असून मागील अनेक दिवसांपासून मौदा येथे वास्तव्याला होते. त्याचे मागे एक मुलगी पत्नी असून एक दिलखुलास व्यक्ती,प्रतिभावंत कवी व चित्रकार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.*
*कैलाश बनकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच त्यांच्या आप्त परिवारासह नागपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना आधी तर सदर बातमी वर विश्वासच पटला नाही परंतू काळ अटळ आहे.व मु्त्यू अंतीम सत्य या आकस्मिक हादर्यातुन सावरत सर्वत्र एकच शोककळा पसरली.व काळाने आपल्यातला एक होतकरू, मनमिळाऊ सखा हिरावून घेतल्याने मीत्र परिवारात एकच स्तब्धता निर्माण झाली*
*आक्रमक लेखनीचा धनी पत्रकार,कवी व चित्रकारास महाराष्ट्र न्युज मीडिया परिवारा तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली. इश्वर कैलास बनकर यांच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो व त्यांच्या परिवारास ओढावलेल्या दुखःतून सावरण्याची शक्ती प्रदान करो*
Maharashtra News Media सच की आवाज