*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग तर्फे कोविड योद्धा डॉ. सुनील टेकाम यांना श्रद्धांजली*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा तथा मु. पो. राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील कार्यरत डॉ.सुनील टेकाम यांचा कोविड -19 रुग्णसेवेत कर्तव्यावर असताना कोविड -19 ची बाधा झाली व दि. 21/8/2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉ.सुनील टेकाम यांनी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती येथून पदवी घेतली होती. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग द्वारा आदिवासी समाजातील या कोविड योध्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिनांक 24/08/2020 रोजी नागपूर येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली याप्रसंगी दिनेश शेराम,विजय परतेकी,स्वप्नील मसराम,श्याम कुमरे,यशवंत मसराम,राहुल मडावी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज